नंदुरबार - स्त्रि सुद्धा एक अद्भुत शक्ती आहे. जिजाऊ, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच भारतीय स्त्रियांचे अस्तित्व साऱ्या जगात अग्रेसर आहे. मुलींच्या संसारात आईने लक्ष देणे थांबवल्यास समाजातील घटस्फोटांचे प्रमाण थांबतील. मुलींवर संस्काराची जबाबदारी कुटुंबाची असून मोबाईल वरील रिल बनवण्यापेक्षा मुलींना तलवारबाजी आणि लाठीकाठीचे प्रशिक्षण द्या म्हणजे अत्याचाराचे नाव ऐकायला मिळणार नाही. त्याचबरोबर स्त्रियांनी न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग करू नये असेही मत अहिल्यानगर येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या भारती शेवते शिंदे यांनी व्यक्त केले.
नंदुरबार येथील महात्मा फुले फाउंडेशनतर्फे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांना सावित्रीची लेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शहरातील अग्रवाल भावनात आयोजित शानदार कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थिती दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलनानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी तसेच महात्मा फुले फाउंडेशनच्या सर्व महिला पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होत्या. यावेळी महामंत्री विजय चौधरी म्हणाले की, महात्मा फुले फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रम प्रेरणादायी असून समाजातील वंचित लाडक्या बहिणींना सावित्रीच्या लेकी पुरस्काराने गौरविण्यात आले. हे कार्य आदर्शवत आहे. तर भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी महात्मा फुले फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक संघटन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षाला लहाडे यांनी
आपला नसून शक्तीचे प्रतीक असल्याचे सांगितले. तसेच पुरुष नसबंदीत नंदुरबार हा जिल्हा अग्रेसर आहे जवळ पास हे प्रमाण 50 टक्के आहे जे कोणत्याही मोठ्या शहरांपेक्षा जास्त आहे.तसेच महिलांच्या आरोग्याविषयी अजून जागरूकतेची आवश्यकता आहे.
महात्मा फुले फाउंडेशन तर्फे नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या 25 महिलांना सावित्रीची लेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता अरुण महाजन यांनी केले. तर सूत्रसंचालन नरेंद्र जाधव यांनी केले. आभार पूनम खैरनार यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा फुले फाउंडेशनच्या योगिता मधुकर माळी, कविता अरुण महाजन, संगीता वासुदेव महाजन, गंगाबाई जगन्नाथ माळी, योगिता सोनवणे, सुशीला शांतीलाल माळी, प्रतिभा नरेंद्र जाधव, पूनम खैरनार, स्वाती पुंडलिक महाजन, संगीता रवींद्र माळी, नीलिमा जगदीश महाजन, वैशाली अविनाश माळी, नलिनी सुरेश माळी, अनिता हिरालाल महाजन, ज्योती संजय देवरे यांनी परिश्रम घेतले.
Satyashodhak, Mahatma phule, Savitri Mata Phule