जत तालुका ओबीसी कार्यालयात होळकर राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी ओबीसी पूर्णवेळ प्रचारक रविंद्र सोलणकर यांनी यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन केले. तर ओबीसी नेते तुकाराम माळी यांनी यशवंतराव होळकर यांचा जीवन परिचय करून देताना म्हणाले की होळकर घराण्यातील यशवंतराव यांचा होळकर जन्म ३ डिसेंबर १७७६, रोजी वाफगाव येथे झला.हे होळकर साम्राज्याचे महाराजा होते. मध्य प्रदेशातील महेश्वर येथे सहा जानेवारी १८०५ साली त्यांनी राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले महाराजा झाले.काशीराव, मल्हारराव व विठोजीराव हे त्यांचे थोरले बंधू. यशंवतरावांनी आपल्या पराक्रमाची चुणूक १७९५ घ्या खर्ड्याच्या निजामाविरूद्ध झालेल्या युद्धात दाखवून दिली ह्या युद्धात यशंवतराव आपले पिता तुकोजीरावासोबत दहा हजार सैन्यासह सामील झाले होते त्या वेळी त्यांचे वय १९ वर्ष या युद्धात निजामाचा पराभव केला. यशंवत महाराज सलग इंग्रजांविरुद्ध १८ युद्ध अपराजित राहिले आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला,इंग्रजांविरूद्ध सलग एकही युद्ध न हारणारा एकमेव महाराजा अशी ख्याती मिळवली, मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठा सम्राट आहे. त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक मराठा सरदारांनी दगा फटका केल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. दुसरे बाजीराव पेशवे यांच्या मुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठं राज्य होत.
यशवंतराव होळकर घराण्यातील एक थोर शूर पुरुष होते.यशवंतराव हे मराठे सरदारांतील एक कर्तबगार वीरपुरुष होते. यशवंतराव हे तुकोजीराव होळकर यांचे पुत्र होते. त्यांना विठोजीराव; काशीराव व मल्हारराव हे भाऊ होते. तुकोजीरावांनंतर इंदूरच्या गादीसाठी तंटे सुरू झाले, तेव्हा काशीराव यांनी पेशव्यांचा, तर दुसऱ्या मल्हाररावांनी सर्जेराव घाटग्यांचा आश्रय घेतला. शिंदे यांच्याकडून दुसरे मल्हारराव यशवंतराव होळकर भांबुर्ड्याच्या लढाईत १४ सप्टेंबर १७९७ रोजी मारले गेल्यानंतर यशवंतराव व विठोजी हे पुण्यातून उत्तरेकडे पळून गेले. तत्पूर्वी यशवंतरावांनी चिमाजीच्या दत्तक प्रकरणात परशुरामभाऊंचा जुन्नरजवळ पराभव केला दुसरे मल्हाररावांचे पुत्र खंडोजी यांच्या नावे राज्यकारभार करण्याचे भासवून सर्व होळकरांना एकत्र येण्याचे आवाहन यशवंतरावांनी केले. यशवंतराव हे नागपूरच्या रघुजी भोसल्यांकडे आश्रयास गेले दुसरा बाजीराव आणि दौलतराव शिंदे यांनी रघुजी भोसल्यांस यशवंतरावांस कैद करण्यास भाग पाडले परंतु यशवंतराव मोठ्या चातुर्याने कैदेतून निसटले आणि धारच्या आनंदराव पवार यांच्याकडे तीनशे स्वारांसह चाकरीस राहिले. पुढे त्यांनी गनिमी काव्याने मध्य प्रांतातील मुलखात पेंढारी, भिल्ल, राजपूत, अफगाण वगैरेंची मोठी फौज तयार केली. दौलतराव शिंद्यांचा सूड घेऊन होळकरांची सत्ता पूर्ववत स्थापण्याचा त्यांचा कृतसंकल्प होता.
दौलतराव शिंद्यांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी यशवंतरावांनी दक्षिण मोहीम काढून घोरपडी, वानवडी, हडपसर व बारामती या लढायांत शिंदे व पेशवे यांच्या फौजांचा पराभव केला दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांचा आश्रय घेतला तेव्हा इतर मराठे सरदारांच्या मदतीने यशवंतरावांनी दुसऱ्या बाजीरावाचा भाऊ अमृतराव यास पेशवेपदी बसविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांनी इंग्रजांविरुद्ध शिंदे व नागपूरकर भोसले यांना मदतीचे आवाहन केले पण त्यांनी प्रत्यक्ष मदत केली नाही. इंग्रजांच्या पराभवानंतर यशवंतरावांनी गुप्त रीत्या एक संयुक्त दल उभारण्यासाठी जयपूर, जोधपूर, उदयपूर, बेगम समरू, रोहिल्याचा मुख्य गुलाम मुहम्मद व काहीशीख राजांना पत्रे पाठविली. तसेच दौलतराव शिंद्यांकडे वकील पाठवून इंग्रजांबरोबरची मैत्री संपुष्टात आणण्याचे फेब्रुवारी १८०४ रोजी आवाहन केले . त्याचा नेमका उलट परिणाम झाला व इंग्रजांनी यशवंतरावांस एकाकी पाडण्याचे व त्यांचे साथीदार फोडण्याचे धोरण अंगीकारले.यशवंतरावांनी आपल्या पराक्रमाने होळकरांच्या दौलतीची मालकीमात्र सिद्ध केली. खजिना हस्तगत करून फौज वाढविली.आपल्या नावाचा शिक्काही त्यांनी तयार केला. इंग्रजांना या भूमीतून उखडून टाकण्याचा एकच ध्यास त्यांना शेवटपर्यंत होता. तसेच त्यांच्या मागणीला – दोआब आणि बुंदेलखंडमधील प्रदेश द्यावा यास – ब्रिटिशांनी नकार दिला तेव्हा होळकरांच्या सैन्याने पुष्कर आणि अजमेर लुटले. तसेच यशवंतरावांनी आपल्या सैन्यातील तीन ब्रिटिश अधिकाऱ्यांना कंठस्नान घातले. ब्रिगेडियर विल्यम मॉन्सनचा पराभव केला. यशवंतरावांनी गनिमी युद्धतंत्राने इंग्रजांना हैराण केले. त्यांच्याकडे ६०,००० घोडदळ, १६,००० शिपाई व १९२ बंदुका होत्या. त्यांचा सेनापती हरनाथ सिंग याने दिल्लीवर हल्ला केला पण यश आले नाही. फरुखाबाद येथे यशवंतरावांचा लेकने नोव्हेंबर १८०४ मध्ये पराभव केला. तेव्हा ते रणजित सिंगांकडे मदतीसाठी गेले आणि डिगच्या किल्ल्यात आश्रयार्थ राहिले तथापि यशवंतरावांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरून त्यांना ब्रिटिशांबरोबर अखेर तैनाती फौजेचा तह करावा लागला . त्यानुसार त्यांस बुंदी टेकड्यांच उत्तरेकडील प्रदेश व टोंक, रामपुरा व इंदूर मिळाले. स्थिरस्थावर झाल्यावर यशवंत-रावांनी सैन्यात सुधारणा करून निरुपयोगी फौज काढून टाकली. बाणपुरा येथे तोफा ओतविण्याचा कारखाना काढला. यशवंतराव होळकर यांचा २८ ऑक्टोबर, १८११ रोजी , भानपुरा, मध्यप्रदेश, येथे त्यांचे निधन झाले.
यशवंतराव हे धाडसी व शूर होते. त्यांस दिल्लीच्या बादशहाने महाराजाधिराज राजराजेश्वर अलिबहादूर असा बहुमानाचा किताब दिला होता. रियासतकारांच्या मते मराठेशाहीच्या अखेरीस यशवंतराव होळकर हे एक असामान्य पुरुष निर्माण झाले, त्या वेळी त्यांच्या तोडीचा दुसरा कोणी सेनानायक नव्हता.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan, Mandal commission