मैत्रेय बुद्ध विहार समिती, मौदा मार्फत दि.१२ ऑक्टोबर २०२४ शनिवारला मौदा,जि.नागपूर येथे २५६८ व्या अशोक विजयादशमी व ६८ व्या धम्मचक्र अनुवर्तन दिवस समता सैनिक दल मार्फत ध्वजारोहण करून मानवंदना दिली व मोठ्या उत्साहात प्रबोधनात्मक साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख वक्ते जगदिश वाडिभस्मे यांनी अशोक विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन बाबत बोलत बौद्ध धम्मातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, मैत्री, करुणा हे तत्व मानवी कल्याणाचा मार्ग आहे आणि याचे प्रतिबिंब आपल्याला भारतीय संविधानात दिसते. तसेच वर्तमानात महापुरुषांचे मोठमोठे स्मारक उभी केली जात आहे पण त्यांचे विचार मारले जात आहे.आणि सम्राट अशोक कालीन बौद्ध विरासत वर्तमान व्यवस्था संपविण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व थांबविण्यासाठी आपल्याला महापुरुषांच्या विचाराचे लोक संसदेत, विधानसभेत व मोक्क्याच्या ठिकाणी पाठवावे लागेल असे मत जगदिश वाडिभस्मे व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भंते मैत्री यांनी मार्गदर्शन केले व प्रमुख पाहुणे भाऊराव वाघमारे यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक वाटप केले. तसेच वैशाली चव्हाण, राजू खवसकर,भाकरे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रदीप कांबळे, लोणारे ताई, डोंगरेजी, बालाजी कांबळे व भजन मंडळ यांनी बुद्ध,भीम गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयाराम लोणारे यांनी केले व संचालन अनिल बोरकर यांनी केले.यावेळेस मोठ्या संख्येने उपासक व उपासिका उपस्थित होते.
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Gautama Buddha, Buddhism