"सत्यशोधक महिला महासंघ" आयोजित कौतुकास्पद सन्मान समारंभ

     तीनखेडा - शनिवार दिनांक 27 जुलै 2024 ला "व्हिजन व्हॉईस अँड वेल्फेअर ऑफ द पीपल सोसायटी,नागपूर," "आईची वाडी" आणि "सत्यशोधक महिला महासंघ" महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 10 वी,12 वी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी, तसेच अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले विद्यार्थी यांचा कौतुकास्पद सत्कार समारंभ आयोजित केला होता.

satyashodhak Mahila mahasangh aayojit kautuk Samman samarambh     या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ. सुशांत पिसे, ( डायरेक्टर - इनार्च रिसर्च सेंटर सक्करदरा, नागपूर) तसेच  कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक मा. अभिजीतदादा वंजारी, ( आमदार - पदवीधर मतदारसंघ, नागपूर विभाग )  मुख्य मार्गदर्शक मा.ज्ञानेश्वरदादा रक्षक (ज्येष्ठ विचारवंत - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रचार प्रसार समिती ) प्रमुख उपस्थिती मा. विनायकदादा तुपकर, ( ज्येष्ठ विचारवंत ) मा. मदनदादा नागपुरे, ( समाजसेवक ), मा. रामकृष्णकाका लेंडे, ( माजी सरपंच - तीनखेडा ) सौ. बेबीताई हिवराळे, ( सरपंच - तीनखेडा ) मा.प्रीतम नासरे, ( उपसरपंच- तीनखेडा ) ऍड. स्नेहल चौधरी ( वडेगाव )

satyashodhak_Mahila_mahasangh_Samman_samarambh     कार्यक्रमाचे मुख्य आयोजक वंदना वनकर, ( अध्यक्ष -आईची वाडी, सत्यशोधक महिला महासंघ, महाराष्ट्र प्रदेश.)  वैभव वनकर (सचिव - आईची वाडी,व्हिजन वोईस अँड द पीपल ऑफ सोसायटी )  श्री. धनराज खोडे, ( माजी नगरसेवक- नरखेड, कोषाध्यक्ष-आईची वाडी व्हिजन वोईस अँड वेल्फेअर ऑफ द पीपल सोसायटी )

     या कार्यक्रमाची सूरूवात स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना वनकर यांनी केले. उद्घाटक मा.अभिजीतदादा यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कुठला अभ्यास करावा,अभ्यासक्रम कसा घ्यावा याची रीतसर माहिती दिली.अभ्यास करताना किंवा काम करताना चिकाटीने करावे हार मानू नये हा संदेश दिला. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक रक्षकदादा यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेबद्दल वेगवेगळी उदाहरण देऊन ब्रेन वॉश केले,

satyashodhak Mahila mahasangh aayojit kautuk samarambh     तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.सुशांत पिसे यांनी विद्यार्थ्यांना त्रिपल आठच गणितच समजाऊन दिले जसे की 8 तास झोप,8 तास शाळा किंवा कॉलेज आणि 8 तास इतर सर्व उर्वरित कामे.

     मा.रामकृष्णकाका लेंडे, मा.प्रीतमदादा नासरे, मा.विनायकदादा तुपकर, मा. संजय बेलखेडे, (मुख्यध्यापक - लोकमान्य हायस्कूल, तीनखेडा) ऍड.स्नेहल चौधरी , वडेगाव ...यांनी विद्यार्थ्यांना अनेक शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले.

     पाहुण्यांचे स्वागत सत्यशोधक थोर विचारवंताची प्रतिमा देऊन करण्यात आले.  सरतेशेवटी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र,स्पर्धा परीक्षा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच खाउंचा वाटप करण्यात आला.

     या कार्यक्रमाप्रसंगी आईची वाडी आणि सत्यशोधक महिला महासंघाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते माननीय प्रवीणा बालपांडे, ( महासचिव - सत्यशोधक महिला महासंघ महाराष्ट्र प्रदेश) मा. मीराताई मदनकर ( उपाध्यक्ष - सत्यशोधक महिला महासंघ), निशा हटवार ( उपाध्यक्ष - सत्यशोधक महिला महासंघ )

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.कविता रेवतकर यांनी तर आभार हेमराज नासरे यांनी केले.

     कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री.सुदाम काका नासरे, ( माजी पोलीस पाटील, तिनखेडा ) सौ.ताराताई धनराज खोडे, बंडूभाऊ नासरे, कुणाल नासरे, हिराताई चक्रपाणी,हर्षल नासरे, सौ.संगीता केवटे, सौ.चंदा नासरे, गुंजन हटवार, त्रिशा वंजारी, आचल हटवार,विनोद नासरे,उदेभान खोडे,प्रशांत नासरे, राहुल खोडे,विनोद नासरे इत्यादीनी अथक परिश्रम घेतले.....

     वंदना वनकर - अध्यक्ष, सत्यशोधक महिला महासंघ, महाराष्ट्र प्रदेश.

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Savitri Mata Phule
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209