चारशेच काय पाचशे सदस्य निवडून आणले तरी त्या संविधान सभेची सर आता येणार नाही - इंजि प्रदीप ढोबळे

 आजीवन मागासवर्गीय म्हणून घेण्यात आम्हाला अभिमान नाही

     नांदेड - परवा पार पडलेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकिमध्ये चारशे खासदार निवडून आल्यानंतर भारतीय संविधान बदलण्याची भाषा कांहीं राजकीय करत होते परंतु चारशेच काय पाचशे सदस्य निवडून आणले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन संविधान सभेमध्ये ओबीसी साठी ३४० हे कलम मंजूर करून घेतले त्याची सर आताच्या सविंधान सभेला येणार नाही आणि चारसो पार म्हनणाऱ्यांना जनतेने आपली जागा दाखऊन दिली आहे असे आरक्षणाची पोटदुखी या पुस्तकाचे प्रसिध्द लेखक, स्मृतिषेश प्रा. हरी नरके फुले-आंबेडकरी विचारधारा साहित्या पुरस्कार प्राप्त विचारवंत इंजि. प्रदीप ढोबळे म्हणाले.

professor Hari Narke Puraskar to Engr pradeep dhobale     पुढे बोलताना इंजि. ढोबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी अनुसूचित जती, जमाती आणि ओबीसी ना विकासाच्या प्रवामध्ये आणण्यासाठी, पुढारलेल्या समाजाच्या बरोबरीने आणण्यासाठी आरक्षनाची तरतूद संविधनामध्ये केली आहे. परंतु सद्या पुढारलेल्या जाती सुद्धा आरक्षण मागत आहेत. परंतु संविधानिक प्रक्रियेतून आरक्षण घ्या उपोषण करून, मोर्चे काढून तसेच सरकारवर दबाव आणून आरक्षण देता येत नाही. ओबीसींचा मराठा आरक्षणाला विरोध नाही परंतु १२ कोटी जनतेसाठी काम करणाऱ्या सरकारने कोणाच्याही उपोषणाला किंवा अन्य दबावाला बळी न पडता संविधनिक मार्गाने आरक्षण द्या. इंदिरा सानी यांनी सांगितल्यानुसार मागासवर्गीय आयोग नेमून त्यांनी दिलेल्या अहवालाने आरक्षणाची मागणी केली तरच कॅबिनेटने निर्णय घ्यावा मुख्यमंत्री किंवा प्रधान मंत्यांनी निर्णय घेवू नये, एखाद्या समाजाचे उपद्रव मूल्य जास्त झाले म्हणून त्याला घाबरून सरकारला आरक्षण देता येणार नाही. तसेच आता ओबीसी समाजाने आपले आमदार, खासदार जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी एकत या असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहिल्यादेवी होळकर, राजर्षी शाहू महाराज, आणि व्ही. पी. सिंग यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार कोसबतवार हे होते. प्रसिद्ध विचारवंत इन्जी. प्रदीप ढोबळे यांना स्वर्गीय नागोजीराव भूमन्ना आक्केमवड यांच्या स्मरणार्थ स्मृतिषेश प्रा. हरी नरके फुले-आंबेडकरी विचारधारा साहित्या पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक, ओबीसी नेते बालाजी इबितदार आणि बीपीएसएस चे राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचानवार . अविनाश भोशिकर यांच्या हस्ते जिल्हाभरातील ओबीसी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थित देण्यात आला. प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. मुरहरी कुंभारगावे यांनी सध्याच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर आपले विचार मांडले.

     राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी लक्षमन क्षीरसागर, दिलीप बलोस्कर, माणिक रेनके, प्रज्ञाधर ढवळे, गोविंदराव सुरनर, गंगाधर मावले, विश्वनाथकोलमकर, इंजी. भारतकुमार कानींदे, बालाजी थोटवे, नागभूषण दुर्गम, श्रावण रॅपणवाड, साहेबराव बेळे, आर के दाभडकर, अब्दुल खदिर प्रा दत्ता कुंचलवाड, संजय अवस्थी चंद्रकला चापलकर, प्रा बेलुरे, प्रा. कोंपलवार, रमेश रामपूरवार, आदींची उपस्थिती होती.

जातसमूह मजबूत होत आहेत बालाजी इबितदार

     प्रत्येक जातीमध्ये जातसमुह अलीकडे मजबूत होत असून देशात आणि राज्यात जातीयता मोठ्या प्रमाणात वाढीस लागत आहे ही थांबविण्यासाठी प्रत्येक जातीतील विचारवंतांनी समोर येऊन आपला भारत देश म्हणून एकत्र येऊन हे जतसंमुह नष्ट करण्यासाठी नियोजनबद्ध कार्य करण्याची गरज आहे असे प्रसिध्द उद्योजक आणि चळवळीचे व्यक्तिमा बालाजी इबितदार म्हणाले.

     प्रास्ताविक भुमन्ना आक्केमवाड व सूतसंचालन प्रा. मारोती लूटे यांनी तर आभार प्रा. बालाजी यशवंतकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते साठी श्रीमंत राऊत, सतीशचंद्र शिंदे, राजेश चिटकुलवार रविंद्र बंडेवार, ओमेश पांचाल, दिलीप काठोडे, दत्ता चापलकर, मुंजाजी काकांडीकर, माधव परगेवार प्रकाश व्यंकटपूरवार, साहेबराव बेळे, सचिन रामदिनवार, गंगाधर नंदेवाड रामराव सुर्यवंशी, व्ही. एन. कोकणे, संजय मोरे, माधव कांबळे यांनी परिश्रम घेतले.

ओबीसी सन्मानाने जीवन जगेल की नाही याची शंका येते- प्रा. डॉ. मुरहरी कुंभारगावे

     स्मृतिषेश हरी नरके यांचे विचार जिवंत ठेवावे म्हणून हरी नरके यांच्या स्मृती निमित्त नागोजीराव भुमना आक्केमवाड यांच्या स्मरणार्थ प्रा. डॉ. प्रदीप ढोबळे यांच्या पुरस्कार देण्यात आला.

Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission, Bharatiya Janata Party
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209