- ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
25 जून 1975 आणीबाणीचा काळ आम्ही नुकतेच एस.एस.सी. नवीन शैक्षणिक धोरणाच्या दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी. या शैक्षणिक धोरणाचा धसका पालक आणि विद्यार्थ्यांनी घेतला होता. त्याआधी कॉमर्स, आर्ट, गणित- सायन्सचे विषय मला वाटते आठवी पासूनच घ्यावे लागत होते. त्यानंतर प्री आणि नंतर ग्रॅज्युएशन असे काहीतरी महाविद्यालयाची शिक्षण पद्धती होती.
आमचे 10 वी पास होणे जीवनातला मोठा अपघात होता. कारण इंग्रजीशी मला आजही मैत्री करता आली नाही. एस.एस.सी. पास झालो. काय शिकायच होते, डॉक्टर होणे डोक्यात इंग्रजीचे साधे ज्ञान नाही. मराठीत आयुर्वेद होत असे. आठवत प्रयत्नाअंती प्रवेश घेतला असता. पण वडील म्हणाले व्यवसायाशी संबंधित शिक्षण घे म्हणून कॉमर्सकडे वळलो. आणीबाणीची दुसरी बाजू :- अकरावीला प्रवेश घेतला तोच काळ होता. तत्कालीन भारताच्या प्रधानमंत्री यांनी 25 जून 1975 आणीबाणी घोषीत करायची. आज एका वर्तमानपत्रा मधील बातमीने जुन्या आठवणीचे स्मरण झाले. आणीबाणी कशाला म्हणतात. तसे आम्हाला तेव्हा कळत नव्हते. रेडिओ आणि वर्तमानपत्र तेव्हा खरे लोकप्रबोधनाचे मुख्य साधन होते. घरात रोजचे वर्तमानपत्र येत नव्हते. पण दुकानातील रद्यीपेपरमधून वर्तमानपत्र वाचनाची आवड. आणीबाणीत काही सामाजिक, राजकीय संघटनावर बंदी घातली. वर्तमानपत्रात शासनाच्या योजनाबदलच बातम्या असायच्या शासनाच्या विरोधात एक ब्र ही लिहिता येत नव्हते. पण आणीबाणी काळात शासकीय खाजगी साऱ्याच यंत्रणेत शिस्त आली होती. प्रत्येक नागरीक आपल्या कामाशी प्रामाणिक होता. लहाणशी तक्रारही नागरिकांना न्याय मिळवून देत होती. भ्रष्टाचार हा शब्दच डिक्शनरीत जमा होता. अन्नधान्याचा नैसंगिक नापिकीमुळे तुटवडा सर्वच खाद्यवस्तुंच्या साठेबाजीवर जबरदस्त अंकुश होता. तेव्हा काही घटनेत शासकीय अधिकारी अतिरेकीप्रमाणे वागले. घरात व्यवसाय असल्यामुळे कळत होते. कारण व्यवसाय करणारे मोठ्या प्रमाणात अशिक्षित अथवा अल्पशिक्षित तरी देशाला पाहिजे असणारी शिस्त आणीबाणीत होती. बेकायदेशीर प्रत्येक घटनेवर त्वरीत कारवाई. राजकीय हस्तक्षेप कुठेच नाही. इंदिरा गांधीचा मुलगा म्हणून संजय गाधी कोणीच नसतांना त्यांचा प्रशासनावर प्रभाव. त्याचा पाच कलमी कार्यक्रमातला वृक्षसंवर्धन आणि कुटूंबनियोजन शस्त्रकि ये चीप भावी अंमलबजावणी. आज वाढत्या लोकसंख्येवर गप्पा करणाऱ्यांना तेव्हा अखरत होत. वाहतुकीच्या नियमापासून तर प्रत्येक शिस्तीला एक आयाम निर्माण झाला होता. काही अतिरेक आणीबाणीत झाला असेल तर तो प्रसिद्धीमाध्यमात न आल्यामुळे त्याची सत्यता दंतकथेसारख्या सांगितल्या जातात. जयप्रकाश नारायण यांचे लोप पावत चाललेले नेतृत्व आणीबाणीमुळे उभरले. क्रांती करून उठले. आणीबाणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या क्रियाशील स्वयंसेवकांना अटक झाली. रामपुरकर गुरूजी नवयुग प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक. ते पण तुरूंगात होते. ग्राहक म्हणून त्यांच्या कुटुंबाला आम्ही मदत केली. समजवादी सर्वच विचारवंत तुरूंगात होते. नानाजी देशमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. आज ते हयात नाही. त्यांना भारतरत्न सन्मान देशाने बहाल केला. तेव्हा ते मध्ये मध्ये शासनाच्या चांगल्या धोरणावर बोलायचे. काही स्वयंसेवक भूमीगत होते. खरे सत्य आणखी एक होते. नागपूरातीतून काही साहित्यिक त्यांची भूमिका संदिग्ध होती. ते कम्युनिस्ट विचारांवर खुप बोलायचे लिहायचे . त्यांच्याशी बोलतांना आजही मला त्यांची विचारसरणी कधी कळली नाही. असे विद्वान सोयीने सुख लुटण्याचा प्रयत्न करतात. पण लोकसमुहात त्यांचा सन्मान संपतो. याच काव्यात खंबीरतेने मी एका जाहीर सभेत तत्कालीन नागपूरचे महापौर रामरतन जानोरकर यांना ठणकावून आणीबाणीच्या विरोधात बोलतांना पाहले. काही दिवसात आणिबाणी उठवावी लागली. 19 महिने भारताने आणीबाणी भोगली. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात जनतापार्टी अस्तित्वात येऊन इंदिरा गांधीची सत्ता लोकशाही पद्धतीने उलथवल्या गेली. पण ही समाजवादी आणि प्रतिगामी यांची वैचारिक युती खूप दिवस टिकली नाही. अल्पकाळातच इंदिरा गांधी पुन्हा जनतेत गेल्या. पोटनिवडणुकीत पुन्हा भरघोस मताने निवडून आल्या. काँग्रेसचे चिन्ह गायवासरू, आणीबाणी नंतर इंदीरा गांधी आणि संजय गांधी विरूद्ध गाय-वासरू याला धरून खुप व्यंग गाजले. आमचे वय त्यावेळेस मिशी फुटायचे पण लोकजीवनाला लागत असलेली आणीबाणीतील शिस्त आम्हाला भावत होती. त्यावेळी झालेल्या अन्यायाच्या अतिरेकाचा निषेधच आहे. मात्र आजही असे वाटते ती आणीबाणीची शिस्त आणखी काही काळ भारतात हवी होती. आज भारत खरेच विश्वगुरू ठरला असता.
- ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
Satyashodhak, Bahujan, Indian National Congress