चंद्रपूर : पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे.
बारावी उत्तीर्ण केलेल्या व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, तसेच व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी मदत होणार आहे. इयत्ता बारावीनंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या; परंतु शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश न मिळालेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यासाठी योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बरेच विद्यार्थ्यांना याबाबत माहिती नसते. त्यामुळे ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
मोठ्या शहरांसाठी भोजन भत्ता ३२ हजार, निवास २० हजार, उदर- निर्वाह भत्ता आठ हजार मिळतो. तर जिल्हापातळीवर भोजन २५ हजार, निवास १२ हजार तर उदरनिर्वाह सहा हजार अशाप्रकारे एकूण ४३ हजार रुपयांची मदत दिली जाते.
नगरपरिषदेच्या क्षेत्रात भोजनभत्ता २८ हजार, निवास १५ हजार, उदर- निर्वाह आठ हजार रुपये देण्यात येतो.
■ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी उच्च शिक्षणाच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षासाठी अर्जाची मुदत दि. २० जून ते १५ जुलै असून, निवड यादी १ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. गरजूंनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
■ या योजनेमुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळत असतो. त्यामुळे वेळीच विद्यार्थ्यांनी अर्ज करावा.
१ गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक साहाय्य देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
२ ओबीसी, एसबीसी व व्हीजे, एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
■ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना वार्षिक ६० हजार रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य दिले जाते.
■ पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, गृहनिर्माण भत्ता, राहणीमान भत्ता, अशा विविध स्तरांवरील भत्ते दिले जातात.
■ या मध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना लाभ मिळत असून उच्च- शिक्षणासाठी मदत होत असते.
विद्यार्थी ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी प्रवर्गातील असावा, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाशी संबंधित शैक्षणिक कागदपत्रे असावीत.
■ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी शासनाच्या महाडीबीटी संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज सादर करावा लागतो.
■ माहिती भरून अर्ज सबमिट केल्यानंतर गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यानुसार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त होते.
■ अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज करावे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission, Savitri Mata Phule