ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही याच आम्हाला सरकार आणि राज्यपालांकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलनापासून जराही बाजूला जाणार नाही. - लक्ष्मण हाके
वडीगोद्री - मराठा आरक्षणानंतर आंतरवाली सराटी जवळील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी आंदोलकांच्या आमरण उपोषणाला वडीगोद्री येथे दुपारी ४ वाजता सुरुवात केली आहे.
आमरण उपोषणामध्ये मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघे आमरण उपोषण करत आहेत. सरकार आणि राज्यपालांच्या लेखी आश्वासनाशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही असे उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके यांनी सांगितले. महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने कुणबी नोंदी दिल्या जात आहेत, त्यामुळे मूळ ओबीसींच्या अधिकारावरती अतिक्रमण होत आहे. ओबीसी व्हीजेएनटीचा दाखला काढायला प्रशासन किमान महिना दोन महिने लावतात मात्र यांना एका टेबलवर कस काय नोंदी मिळतात. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही याच आम्हाला सरकार आणि राज्यपालांकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलनापासून जराही बाजूला जाणार नाही. परंपरेने हजारो वर्ष दुय्यम वागणूक मिळणाऱ्या समाजाच्या हक्काचे आणि अधिकाराचे आंदोलन असल्याचे हाके म्हणाले. यावेळी ओबीसी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.