सत्यशोधक विवाह सोहळा देऊळगाव राजात संपन्न

सत्यशोधक चित्रपट निर्माते श्री.सुनिल शेळके यांच्या साक्षीने सागर व संध्या यांच्या सत्यशोधक विवाह सोहळा देऊळगाव राजात प्रथमच संपन्न

     22 मे 2024 वार बुधवार रोजी  देऊळगाव राजा नगरीमध्ये पारंपरिक पद्धतीला फाटा देत कुठलाही हुंडा न घेता कुठलेही आंधन भांडे भेट वस्तू आहेर पाणी न स्वीकारता वैदिक मंत्रोच्चारांचे स्तोम न करता क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या विचाराने प्रेरित होऊन साध्या सोप्या पद्धतीने सत्यशोधक विवाह संपन्न झाला सत्यशोधक समाज संघाचे विधीकर्ते श्री.भगवान रोकडे व मौर्य आकाश मेहेत्रे यांनी हा विवाह संपन्न केला

Satyashodhak Vivah Sohla first time in Deulgaon Raja     सिंदखेड राजा नगरीतील प्रतिष्ठीत व्यावसायिक,माजी नगरसेविक सौ.रमा व श्री.एकनाथ बाबुराव मेहेत्रे यांचा मुलगा चि.सागर मेहेत्रे व जामवाडी ता.जि.जालना येथील श्रीमती सुनिता व कै.सुरेश बाबासाहेब बडदे यांची कन्या संध्या बडदे यांचा सत्यशोधक विवाह सोहळा अक्षदा ऐवजी फुलांची उधळण करून ,डीजे बॅड न लावता टाळ्यांचा कटकटात संगीतनादात उत्साहात पार पडला.प्रसंगी वर वधू हस्ते महापुरुषांना व विट्टलच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते श्री.सुनिल शेळके यांनी आशीर्वादपर शुभेच्छा देवून समाजाने सत्यशोधक विवाह पध्दतीचा अवलंब करून समाजाचा वेळ,पैसा,श्रम वाचवावे.सांस्कृतिक चळवळ बहुजनांनी स्वतःच्या हातात घ्यावी असे आवाहन केले.वर मुलगा सागर मेहेत्रे यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले विधीकर्ते सत्यशोधक भगवान रोकडे यांनी या पध्दतीचे महत्त्व पटवून सांगितले. सत्यशोधक मौर्य आकाश मेहेत्रे यांनी सत्यशोधक चळवळीने समाज खरा सत्यशोधकी धार्मिक बनावा,अवडंबर टाळून संत सावता महाराजांचा "स्वकर्मी व्हावे रत,मोक्ष मिळे हातो हात" असा कर्मवादी व्यक्ती घडविण्याचा आग्रह उपस्थितापुढे मांडला.सत्यशोधक विवाहासाठी जनसेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री उमेश खरात अध्यक्ष स्वतः वर मुलगा श्री.सागर मेहेत्रे यांनी अतोनात मेहनत घेतली. सागर मेहेत्रे हे जनसेवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम सिंदखेड राजात राबवत असतात त्यांनी महापुरुषांचे विचार फक्त डोक्यातच नाही तर स्वतःच्या आचरणात सुध्दा आणायला हवे हे स्वतः च्या कृतीतून करून दाखविले.त्यांच्या या आदर्श विवाह सोहळा प्रसंगी उपस्थित समाज बांधवांनी तोंडभरून कौतुक केले.विवाह प्रसंगी वधू वरा कडील मोजकेच पाहुणे मंडळी व मान्यवर उपस्तित होते. वधू वर यांना सुनील शेळके साहेबांनी ग्रामगिता भेट देऊन वैवाहिक जीवनास शुभेच्छा दिल्या.तसेच डॉ. श्याम मुडे अध्यक्ष सत्यशोधक शिक्षक सभा महाराष्ट्र यांनी महात्मा फुले समग्र वाडमय शुभेच्छा पर भेट दिले.वर मुलगा चि.सागर मेहेत्रे याने घेतलेल्या धाडसी निर्णय हा कौतुकास्पद व चर्चेचा विषय ठरला आहे. यां महागाई च्या काळात नवयुवकांनी कुठलाही अवाजवी खर्च न करता यां आदर्श सत्यशोधक पद्धतीने विवाह करायला हवा.

Satyashodhak, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, Bahujan, Savitri Mata Phule
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209