बुधवारी जालना शहरा मध्ये कुठलेही वैदिक मंत्रोच्चारांचे स्तोम न करता साध्या सोप्या सत्यशोधक पद्धतीने सत्यशोधक विवाह सोहळा सत्यशोधक समाज संघाचे विधीकर्ते मौर्य आकाश मेहेत्रे व सत्यशोधक भगवान रोकडे तसेच नातलगांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रथमच जालना शहरामध्ये सार्वजनिक सत्यधर्मीय सत्यशोधक पद्धतीने लग्न कसे लावल्या जाते हे पाहण्यासाठी जालना शहरातील अनेक नागरिकांनी विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
जालना जिल्हापरिषद शाळेतील वरिष्ठ शिक्षक देविदास राधाकिसन काळे सौ. सुनिता काळे यांचा मुलगा डॉ. चि. अतुल काळे रा. वखारी ह.मु. जालना व जालना येथील श्री.बाबासाहेब गणपत राऊत व सौ. शांता राऊत यांची सुकन्या चि. सौ. कां. डाॅ. प्रतिक्षा राऊत यांचा सार्वजनिक सत्यधर्मीय सत्यशोधक विवाह सोहळा अक्षदा ऐवजी फुलांची उधळण व टाळ्यांक्या कडकडात मोठ्या उत्साहात पार पडला. प्रसंगी वर वधुंच्या हस्ते महापुरुषांचे स्मरण पुजन करण्यात आले. भारतीय नवदांपत्य सिंधु संस्कृतीनूसार ब्रम्हचर्य आश्रमातून गृहस्थाश्रमात प्रवेश करतो म्हणून एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात करतांनाचा तळी उचणे प्रवेश विधीने सार्वजनिक सत्यधर्मीय सत्यशोधक विवाह सोहळा सुरू झाला. लग्न संस्कारासारखे सांस्कृतिक कार्य हे समजून उमजून व्हावे असे विधीकर्ते सत्यशोधक मौर्य आकाश मेहेत्रे व सत्यशोधक भगवान रोकडे यांनी या पध्दतीचे महत्त्व पटवून देतांना सांगितले.
वरपिता श्री. काळे सर यांनी हे सत्यशोधक कार्य घडवून आणण्यासाठी अतोनात मेहनत घेतली. त्यांच्या या आदर्श सार्वजनिक सत्यधर्मीय विवाह सोहळा उपक्रमाचे उपस्थित प्रबुद्ध शिक्षक वर्गाने व विविध क्षेत्रातील नेतृत्वांनी तोंडभरून कौतुक केले. कित्येक बांधवांनी प्रत्यक्ष भेटून खुप छान सार्वजनिक सत्यधर्मीय सत्यशोधक विवाह संपन्न केला असे उद्गार काढले. आम्ही पण आमच्या मुलामुलींचे असेच विवाह करणार असे उपस्थित बांधवांनी स्वतःहून सांगितले. तेव्हाच सत्यशोधक समाज संघास यांनी या विधी पित्यर्थ श्री. काळे सर यांनी स्वयंमप्रेरणेने ३१०० रू समाज जागृती निधी सत्यशोधक समाज संघाला सहयोग निधी देत असे जाहीर केले. उपस्थित पुरुष व महिलांनी लग्नविधी सुरू असतांना उस्पुर्तपणे मध्येच टाळ्यांचा कटकटात करून आनंद व्यक्त केला.
जालना ग्रामीण व जालना शहरातील तरुण युवक युवतींनी या डाॅक्टर नवदांपत्याचा आदर्श घेवून स्वतः हून पुढे यावे असे. काँग्रेस पदाधिकारी, समता परिषद तालुका अध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, समाजभुषन श्री.भाष्कर आंबेकर मित्रमंडळाचे श्री. गणेश तरासे यांनी व्यक्त केले. प्रसंगी मा शिक्षणाधिकारी (माद्य) श्री.मंजाजी चौधरी, बुलढाणा जि. उपाध्यक्ष भाजपा ओबीसी श्री विष्णू मेहेत्रे, मा. जिप सदस्य श्री. बबनराव खरात, मा. पंस सदस्य श्री. सर्जेराव शेवाळे, शिवसेना नेते श्री प्रभाकर घडलिंग, नगरसेविका सौ. पुनम राज स्वामी, मा. सभापती श्री बंडू मोहिते, शिक्षक परिषदेचे जि. अध्यक्ष श्री मंगेश जैवाळ, अखिल महाराष्ट्र प्रा. शिक्षक संघाचे जि. अध्यक्ष डाॅ. रविंद्र काकडे, शिक्षक महामंडळाचे जि. अध्यक्ष श्री रमेश हुसे, प्रहार शिक्षक संघटनेचे जि अध्यक्ष श्री मुकुंद खरात, शिक्षक समितीचे जि अध्यक्ष श्री दिनेश एरंडे, शिक्षक भारतीचे जि अध्यक्ष श्री.देवेंद्र बारगजे, शिक्षक सोसायटी संचालक श्री मधुकर काकडे, शिक्षक सोसायटी संचालक श्री रघुनाथ वाघमारे, शिक्षक सोसायटी संचालक श्री सचिन गंगावणे, शिक्षक सोसायटी संचालक श्री भुतेकर, जि अध्यक्ष मागासवर्गीय शिक्षक संघटना श्री सिध्दार्थ गजभिये, श्री शांतिलाल गोरे, श्री राजेंद्र कायंदे, श्री रवि तारो, श्री भानुदास लोखंडे, ओबीसी अधिकारी कर्म संघ जिल्हा अध्यक्ष श्री सुनिल भालतिलक, श्री एकनाथ खरात, श्री लक्ष्मण जोशी, आदर्श शिक्षक गणेश खरात, श्री संजय कायंदे, श्री प्रमोद पवार, श्री शांतिलाल खरात, शिक्षकनेते श्री श्यामराव खांडेभराड, श्री रामदास केळकर, केंद्रप्रमुख श्री विष्णू तिडके, केंद्रप्रमुख श्री गंगाधर राजकर, केंद्रप्रमुख श्री लक्ष्मण देशमुख, केंद्रप्रमुख श्री अशोक इंगळे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा नेते, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष, ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ जालनाचे जिल्हा प्रभारी तथा सत्यशोधक समाज संघाचे मौर्य आकाश मेहेत्रे असे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उत्साहवर्धक उपस्थित सोहळा संपन्न झाला.
दुसऱ्या दिवशी सत्यशोधक मौर्य आकाश मेहेत्रे यांनी नवदांपत्यांची सत्यपुजा विधी (आनंद सोहळा) संपन्न करून दोंन्ही कुटुंबाला शुभेच्छा देवून विधी संपन्न केला...
Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan