डॉ. बाबासाहेब आंबेडकर संक्षिप्‍त जीवनचरित्र

जन्म दिवस – १४ एप्रिल १८९१ – महू • मृत्यू – ६ डिसेंबर १९५६ (दिल्ली)

संक्षिप्‍त जीवनचरित्र

• बाबासाहेबांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सपकाळ व माता भीमाबाई यांच्या पोटी जन्माला आलेले बाबासाहेब हे १४ वे अपत्य होते.

• त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबावडे हे होते. त्यावरुन त्यांचे आडनाव आंबावडेकर पडले .
Dr Babasaheb Ambedkar Sankshipt charitra

शिक्षण -

• १९१५ मध्ये त्यांनी “ऍडमिनिस्ट्रेशनऍन्ड फायनान्स ऑफ दि इस्ट इंडिया कंपनी” हा प्रबंध सादर करुनएम.ए. ची पदवी मिळविली.

• ऑक्टोबर १९१५ मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ऍन्ड पॉलिटिकल सायन्स येथे एम. एस्सी.साठी प्रवेश घेतला. परंतु आर्थिक अडचणीमुळे भारतात परत आले. तेथे“प्रोव्हिन्शियाय डिसेंट्रलाजेशन ऑफ इंपीरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया” या प्रबंधाबद्दल १९२१ मध्ये एम. एस्सी पदवी मिळाली.

• नोव्हेंबर १९१६ मध्ये जर्मनीतील ग्रेज इन विद्यापीठात बॅरिस्टरच्या अभ्यासक्रमासाठी नाव दाखल केले. १९२३ मध्ये बॅरिस्टर पदवी मिळविली.

• १९१५ मध्ये कोलंबिया विद्यापीठात पी. एचडी. साठी सादर केलेल्या “नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया ए हिस्टोरिकल ऍन्ड ऍनलिटिकल स्टडी” या प्रबंधाद्दल १९१७ मध्ये डॉक्टरेट मिळाली• १९१७ मध्ये भारतात आल्यानंतर कराराप्रमाणे त्यांनी बडोदा संस्थानात सयाजीराव गायकवाड यांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नोकरी केली. तेथे त्यांना अस्पृश्यतेचे चटके बसले.

१९२० मध्ये उरलेल्या अभ्यासक्रमात पूर्ण करण्यासाठी लंडनला रचला झाले.

•१९२२ मध्ये आंबेडकरांना त्यांनी लंडन विद्यापीठामध्येसादर केलेल्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधाला मान्यता मिळून डी. एस्सी. ही पदवी ,मिळाली.• बाबासाहेबांना इंग्लंडमधील शिक्षणासाठी शाहू महाराजांनी मदत केली.

विवाह -

• एप्रिल १९०८ मध्ये बाबासाहेबांचा विवाह दापोलीच्या भिकू वलंगकरांच्या रामू उर्फ रमाबाई यांच्याशी झाला.

• १९३५ मध्ये रमाबाईचे निधन झाल्यानंतर एप्रिल १९४८ मध्ये आंबेडकरांनी मुंबईच्याडॉ. सविता कबीर (माई आंबेडकर) दिल्लीत नोंदणी पध्दतीने दुसरा विवाह केला.

कार्य -

• २० व २१ मार्च १९२० रोजी कोल्हापूर संस्थानात माणगाव येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अस्पृश्यांच्या परिषदेत त्यांनी पहिले जाहिर भाषण केले.

• आंबेडकरांचा सवर्णा विरुध्दचापहिला लढा म्हणजे महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रहहोय. १९ व २० मार्च १९२७ रोजी महाड येथे बहिष्कृत हितकारणी सभेतर्फे कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेने पहिले अधिवेशन आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.२० मार्च रोजी आंबेडकरांनी आपल्या अनुयांयांसह चवदार तळयाचे पाणी पिऊन आपल्या समता प्रस्थापनेच्या लढ्यात रणशिंग फुंकले.

• त्यावेळी आंबेडकरांनी आंबेडकर सेवा दलाचा स्थापना केली. त्याचे एप्रिल १९३१ मध्ये परळ येथे समता सैनिक दलात रुपांतर करण्यात आले.

• महाडच्या सत्याग्रहानंतर जनजागृतीसाठी बहिष्कृत भारत पाक्षिक चालू केले.

• ४ सप्टेंबर १९२७ मध्ये त्यांनी समाज समता संघ ही संघटना स्थापन केली.

• मनुस्मृती दहन – २५ डिसेंबर १९२७ ला महाड येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सत्याग्रह परिषद संपन्न झाली २५ तारखेला विषमतेच्या पुरस्कार करणा-या मनुस्मृतीचे आंबेडकरांच्या नेतृत्त्वाखाली गंगाधर निळकंठ सहस्त्रबुध्दे या ब्राह्मण सहका-याच्या हस्ते दहन करण्यात आले.

सत्याग्रह

• १३ ऑक्टोबर १९२९ मध्ये एस. एम. जोशी यांच्या नेतृत्त्वाखाली पुण्याच्या पर्वतावरील मंदिरात प्रवेशकरण्यासाठी पहिला सत्याग्रह झाला• २मार्च १९३० रोजी बाबासाहेबांच्यामार्गदर्शनाखालीदादासाहेब गायकवाड यांनी नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह केला. परंतु मंदिर प्रवेशासाठी १९३५ पर्यत लढा चालू होता. ( PSI पूर्व परीक्षा – २००८)

• एचिलपूर येथील दत्त मंदिर खुले झाले. अमरावतीचे अंबेचे मंदिर व सोलापूरच्या सिध्देश्वर देऊळ सत्याग्रह योजना आखल्या.

• १९३३ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात मुखेड येथे हिंदूच्या धार्मिक ग्रंथ पारायणासाठी आंबेडकरांनी सत्याग्रह केला.

वृत्तपत्र विषयक कार्य

• ३१ जानेवारी १९२० रोजी बाबासाहेबांनी अस्पृश्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मूकनायक हे पहिले पाक्षिक सुरु केले. या वृत्तपत्राचे संपादक देवरामविष्णु नाईक हे होते, तर प्रकाशक आंबेडकर होते.

• १९२४ मध्ये आंबेडकरांनी बहिष्कृत मेळा हे वृत्तपत्र सुरु केले.

• ३ एप्रिल १९२७ मध्ये बहिष्कृत भारत या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. काही काळ हे वृत्तपत्र बंद पडले.

• २४ नोव्हेंबर १९३० रोजी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र पुन्हा सुरु झाल्यावर पुनश्च हरिओम हा अग्रलेख लिहिला.

• आंबेडकरांनी १९२७मध्ये समता हे वृत्तपत्र सुरु केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. याचे संपादक देवराम नाईक हे होते.

• आंबेडकरांनी २४ नोव्हेंबर १९३० मध्ये जनता हे वृत्तपत्र सुरु केले १९४४ मध्ये त्यांनी “आम्ही शासनकर्ती जमात बनणार” या शीर्षकाखाली लेख लिहिला.

• पुढे जनता पाक्षिकाचे ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये “प्रबुध्द भारत” या प्रकारचे नामातंर झाले.

आंबेडकरांचे मुद्रणालय – भारत भूषण प्रिटिंग प्रेसशैक्षणिक कार्य

• अस्पृश्य समाजात जागृती करण्यासाठी शैक्षणिक प्रगती घडवून आणण्यासाठी २० जुलै १९२४ मध्ये बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने अस्पृश्यांसाठी वाचनालये, प्रौढांसाठी रात्रीच्या शाळा सुरु केली. शिकासंघर्ष करा, संघटीत व्हा हे या सभेचे ब्रीदवाक्या होते.

• बाबासाहेबांनी १९४६ मध्ये पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेतर्फे मुंबईला २०जुन १९४६ मध्ये सिध्दार्थ कॉलेज व औरंगाबाद येथे १९५० मध्ये मिलिंद कॉलेज सुरु झाले.

• आंबेडकरांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.

• आंबेडकरांनी स्त्रियांना “शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा” ही त्रिसूत्री दिली.

राजकीय कार्य

• इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनल्ड यांनी ऑगस्ट १९३२ मध्ये जातीय निवाडा जाहिर केला. त्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले. गांधीनी येरवडाजेलमध्ये २० सप्टेंबर १९३२ पासून प्राणंतिक उपोषण सुरु केले. २४ सप्टेंबर १९३२ रोजी बॅ. जयकर, यांनी आंबेडकरांशी चर्चा करुन त्यांच्यात तडजोड घडवून आणली. या दिवशी आंबेडकरांनी गांधीचे प्राण वाचविण्यासाठी एका करारावर सहया केल्या त्यासपुणे करार किंवा येरवडा करार असे म्हणतात.

• अस्पृश्यांचा लढा गतिमान करण्यासाठी व १९३५ च्या कायदयाने होणा-या निवडणुका लढविण्यासाठी १५ ऑगस्ट १९३६ मध्ये आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.

• त्यांच्या प्रयत्नाने १९४१ मध्ये भारतीय लष्करात महार रेजिमेंट ची स्थापना झाली.

• जुलै १९४२ मध्ये व्हाईरसरॉयच्या कार्यकारिणीचे सदस्य म्हणून नियुक्त झाले. तेथे त्यांनी मंजुर मंत्री होते.

• अस्पृश्यांचा उध्दार करण्यासाठी नागपूर येथे १९४२ मध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्टस् फेडरेशनची स्थापना केली. यांचे अध्यक्ष एन. शिवराजन हे होते.

• बाबासाहेबांनी नागपूरहून रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली.प्रत्यक्षात त्यांच्या मृत्यूनंतर या पक्षाची स्थापना मद्रास येथे एन. शिवराजन यांनी ऑक्टोबर १९५८ मध्ये केली.घटनेचे शिल्पकार

• बॅ.जयकरांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर बंगाल प्रांतातून विधीमंडळ कॉग्रेस पक्षाने घटना समितीवर निवड केली. ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्रिय मंत्रीमंडळ कायदा मंत्री म्हणून नेमणूक झाली. २९ ऑगस्ट १९४७ मध्ये घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. घटना निर्मितीचे कार्य त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यामुळे त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटले जाते.

• १२ ऑगस्ट १९४९ मध्ये हिंदू कोड बिलात सुधारणा करुन संसदेत सादर केले. स्त्रियांना व समाजातील सर्व घटकांना समान हक्क देणा-या या कोड बिलामुळेच त्यांना आधुनिक मनु म्हणून ओळखले जाते.

धर्मातर -

• १९ऑक्टो १९३५ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवले येथे भरलेल्या अखिल मुंबई इलाखा अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात घोषणा केली की “मी जरी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो नाही तरी हिंदू म्हणून मरणार नाही.” ही त्यांची धर्मातराची पहिलीच घोषणा होती.

• विजया दशमीच्या दिवशी १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये नागपूर येथे दीक्षा भूमीवर, बौध्दभिक्क्षू चंद्रमणी महास्थवीर यांच्या हस्ते लाखो अनुयायांच्या उपस्थितीत बौध्द धर्माची जाहीर दीक्षा घेतली.

कार्य

१) महार आणि त्यांचे वतन (मराठी) २) फेडरेशन व्हर्सेस फ्रीडम ३) थॉटस ऑन पाकिस्तान ४) प्रॉब्लेम ऑफ शेड्यूल कास्ट्समरणोत्तर महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले त्यांचे अप्रकाशित ग्रंथ १) फिलॉसॉफी ऑफ हिंदुइजम २) एसे ऑन अनटचेबल्स ऍन्ड असटचेबिलीटी २) रिडल्स इन हिंदुइजम (१९५७) ४) पॉली ग्रामर ऍन्ड पॉली डिक्शनरी

बहुमान -

• सयाजीराव गायकवाड यांनी दलितांचा मुक्तीदाता या शब्दांत डॉ. आंबेडकरांचा गौरव केला.

• १४ एप्रिल १९९० मध्ये डॉ. आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

महापरिनिर्वाण

• ६ डिसेंबर १९५६ मध्ये आंबेडकरांचे झोपेतच महापरिनिर्वाण झाले. त्यांचे समाधीस्थळ चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते.

Satyashodhak, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209