लिंबागणेश - दि. २३ : बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायत कार्यालयात दि. २३ मार्च शनिवार रोजी शहिद दिनानिमित्त देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली
वाहण्यात आली. यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, ग्रां.स. श्रीहरी निर्मळ, दामु थोरात, समीर शेख, अक्षय वाणी, रमेश गायकवाड, पत्रकार हरिओम क्षीरसागर, अॅड. गणेश वाणी, विक्रांत वाणी, भगवान मोरे, संतोष भोसले, गणपत तागड, भरत वाणी, ग्रा.म. कर्मचारी जिवन मुळे, कचरू निर्मळ आदि उपस्थित होते. शहिद दिनाचे महत्त्व विशद सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केले.