खरे तर छ. शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू असणाऱ्या चळवळींना जसे सामाजिक व ऐतिहासिक वलय लाभले व त्यांनी या मापुरुषांचे विचार जीवंत ठेवण्यासाठी जी मेहनत घेतली, तेवढी मेहनत राष्ट्रपिता फुले यांच्या चळवळीला घेणारे कार्यकर्ते फारच दुर्मिळ प्रमाणात लाभले. पण फुलेंचे विचारच छ. शिवराय व डॉ आंबेडकर या महापुरुषांच्या चळवळीचा पाया होता हे आपण विसरता कामा नये. कारण छ. शिवरायांचा पहिला पोवाडा लिहिणारे व त्यांची समाधी शोधणारे जसे राष्ट्रपिता फुले होते तसेच डॉ आंबेडकरांच्या चळवळीचे गुरुही राष्ट्रपिता फुलेच होते. हे सारे सत्य असताना फुलेंना समाज का विसरला व त्यांनी फुले चळवळ फोफावून समाजाला शहाणे करण्याचा आणि ब्राम्हणी कचाट्यातून सोडवण्याचा प्रयत्न का नाही केला? याचे मोठे आश्चर्य वाटते.
पण राष्ट्रपिता फुले चळवळीचे एक विशेष असे वाटते की, हि चळवळ आंबेडकरी समाजाने जसे आपली केली, तसी ओबीसी समाजाने का केली नाही याचे विशेष वाटते. म्हणून म्हणावेसे वाटते की, "बा ज्योतिबा, तुझी नीती, गती आणि मती, बौद्धांना कळाली. पण तुझ्याच ओबीसींकडे का नाही वळाली ?
रा. फुले चळवळीला बौद्धांनी जगाच्या वेशीपर्यंत नेले. एवढेच नाहीतर डॉ आंबेडकरांचे गुरू म्हणून फुलेंचा जगात अभ्यास सुरू झाला. फुले जलशा- तूनच डॉ आंबेडकरी जलशाची मिळालेली प्रेरणा आहे. तसेच डॉ आंबेडकरांच्या सर्वच साहित्यावर फुले विचारांचा प्रभाव आहे. म्हणून तर सत्यशोधक चित्रपटाचा शेवट डॉ आंबेडकरांच्या भाषणाने केलेला आहे.
सत्यशोधक चित्रपटात रा. फुलांची ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध क्रांती दाखवलेली आहे. पण त्यात कुठेच चूकीचा सांस्कृतिक वारसा दाखवलेला नाही. उलट रा. फुलेंनी संत सावता यांचा वारसा जीवनभर जपून शेती केल्याचे दाखवलेले आहे. तसेच ब्राम्हणी समाजाविषयी त्यांनी कुठेच वैर व तिरस्कारही वापरलेला नाही. उलट ब्राम्हणी काशीबाईचे प्राण वाचवून तिचे बांळतपण सुखरुप करुन तिच्याच मुलाला दत्तक घेतले व लहानचे देश मोठे करुन त्याला आपले वारस नेमले. मग रा. फुले यांनी ब्राम्हणांविरुद्ध ब्राम्हणेतर चळवळ का आयुष्यभर चाल- वली? तर याचे उत्तर साधे आणि सरळ आहे आणि ते म्हणजे ब्राम्हणी वर्णाने वर्ण श्रेष्ठत्वाच्या नावाखाली स्वार्थापोटी केलेले ब्राम्हणेतरांचे शोषण हे होय.
या चित्रपटात जवळ जवळ रा. फुलेंनी जीवनातील सर्वच घटना दाखवण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केलेला आहे. मुलींची शाळा, वडील गोविंदरावांनी विरोध, उद्योग व्यवसाय, सत्यशोधक विचारधारा व सत्यशोधक धर्म स्थापना महात्मा पदवीने जनगौरव इ. इ.
पण या चित्रपटात दिग्दर्शक एक घटना दाखवायचे विसरले व ती घटना म्हणजे, रा. फुले त्यांच्या तारुण्यावस्थेत गंज पेठेतील नारायण बुवांच्या कबीर मठात 'कबीर बीज' शिकण्यासाठी घालवलेल वयाची दीड दोन वर्षे हि होय. कारण हि घटना दाखवली असती तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरू का मानले ? याचा अर्थ समाजाला चांगलाच समजला असता. कारण काशीत असताना संत कबीराने गेयेला जावून भ. गौतम बुद्धांच्या साहित्याचा अभ्यास केला. यानंतर संत कबीरांच्या साहित्याचा अभ्यास रा. फुले यांनी केला व रा. फुले त्यांच्या साहित्याचा अभ्यास. डॉ आंबेडकरांनी केला. म्हणून संत कबीर, रा. फुले व डॉ आंबेडकर हे बुद्धांच्या जवळ गेले व त्यांना सामाजिक जागृतीच्या परिवर्तनाची जाणीव झाली व त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य सार्थकी लावले. बुद्धांच्या जवळ गेलेल्या या तिन्ही महामानवांनी आपापले पंथ, धर्म स्थापन केले. संत कबीरांचा कबीर पंथ, रा. फुले यांचा सत्यशोधक तर डॉ आंबेडकरांनी या सर्व धर्म, पंथाचेच एकमेव मर्म जाणून बौद्ध धम्म स्विकारला. म्हणून तर या सत्यशोधक चित्रपटाचा शेवट डॉ आंबेडकरांच्या समतावादी, बंधुतावादी व न्यायवादी विच- कराने केला. म्हणजेच थोडक्यात दिग्दर्शकाने रा. फुले यांच्या विचारांची व स्वप्नांची परिपूर्ती डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मर्गक्रमणात व विचारात दाखवली. याच आंबेडकरी मार्गाने ओबीसी समाजाला बुद्धांपर्यंत जावेच लागेल, तरच ओबीसी बांधवांचे राष्ट्रीयत्वाचे, बंधुत्वाचे स्वप्न साकार होईल.
तसेच या चित्रपटात लहुजी साळवे वस्ताद यांची भूमिका फार महत्वाची आहे. कारण जसे संत गाडगेबाबा हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, तसेच वस्ताद लहुजी साळवे हे सुद्धा रा. फुलेंच्या पाठीशी कायम उभे राहिले. यामुळे माता सावित्रीबाईची भूमिका जेवढी पतीकार्य निष्ठेची आहे. तशीच वस्ताद लहुजी साळवे यांची आहे. पण या चित्रपटात एक प्रसंग संशयास्पद असून त्याचे संदर्भ फुले साहित्यात कोठेच मिळत नाही आणि तो प्रसंग म्हणजे, सात ब्राम्हणी मित्रांनी रा. फुले यांच्या समाजकार्याला केलेली मदत व त्या ब्राम्हणांना ब्राम्हणी धर्मपीठाचसमोर उभे करण्याची शिक्षा हे होय. हि घटना दिग्दर्शकाने स्वतःच्या मनाने चित्रपटात घुसडवल्याची दाट शंका येते.
बाकी सर्वच कथानक दिग्दर्शकाने चांगलेच जुळवलेले असून ते कौतुकास्पद आहे. यामुळे हा चित्रपट प्रत्येकाने पहाण्यालायक बनला आहे. यासाठी हा चित्रपट सर्वच समाजाने पहावा व रा. फुले, माता सावित्रीबाई, वस्ताद लहुजी साळवे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यावे. असे वाटते.
- दिपक गायकवाड
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan, Mandal commission, Savitri Mata Phule