संघर्षकन्या : कॉ. उज्वला पडलवार

      "कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही", 'आवाज दो हम एक हैं" अशी डरकाळी फोडत मुर्दाड शासनाला सत्ताधाऱ्यांना जागे करीत शोषित, वंचित, पिडीतांच्या न्याय हक्कांसाठी त्वेषाने लकॉ. उज्वला पडलवार, कामगार चळवळीतील एक आश्वासक चेहरा ठरली आहे. डाव्या चळवळीचे बाळकडू आपल्या वडिलांकडून मिळाल्यानंतर तिने कौटुंबिक आणि सामाजिक संघर्षही अगदी सहज पचवला आहे. ललआणि लच जिने आपले आयुष्य मानले. किनवट तालुक्यातील सावरगाव या छोट्या गावातून हसत-खेळत- बागडत बालपण घालविणारी उज्वला, मुंबईच्या आझाद मैदानावर कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आवाज बुलंद करणारी कॉ. उज्वला पडलवार म्हणून सिद्ध होते, ही तिची संघर्ष कथा अनेकांना थक्क करणारी तर अनेकांसाठी प्रेरणादायी होते.

Sangharsh Kanya Com Ujwala Padalwar     किनवट तालुक्यातील सावरगाव येथे दुग्धव्यवसाय करणाऱ्या काशिनाथ पडलवार यांची कन्या उज्वला ही आपल्या वडिलांकडूनच कामगार, शेतमजूर, महिला, कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढायचे कसब शिकते. न्यायासाठी शासनाशी भांडते; प्रसंगी आंदोलन, उपोषण, संप, बहिष्कार, असहकार अशी सर्व क्षेत्रं लिलया वावरते आणि कामगारांसाठी आशेचा किरण ठरते, ही या नांदेडच्या कामगार चळवळीसाठी अत्यंत जमेची बाब ठरली. महाविद्यालयीन जीवनातही विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी तिने संघर्षाची मशाल आपल्या हाती घेतली. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेची पदाधिकारी म्हणूनही तिने दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असे राहिले आहे. विषय शिष्यवृत्तीचा असो अथवा नोकरीतील अन्याय- अत्याचाराचा; न्यायासाठी संघर्ष करणारी कॉ. उज्वला पडलवार ही नेहमीच आक्रमक राहिली आहे.

     महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर उज्वलाने सीटूमध्ये कामाला सुरूवात केली. कामगारांचे प्रश्न हाती घेऊन उभारले, अंगणवाडी सेविकांचा तिने उभारलेला लढा ऐतिहासिक ठरला. आशावर्कर, गट प्रवर्तक यांच्या मानधनवाढीसाठी नांदेड ते मुंबई असा संघर्ष करीत तिने आझाद मैदानावरही आपला आवाज बुलंद केला. विरोधी पक्षापासून ते सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वांनीच तिच्या आंदोलनाची दखल घेतली. सत्य पराजित नहीं हो सकता यानुसार ती सत्यासाठी भांडते, संघर्ष करते. त्यामुळे आपसूकच कामगार चळवळीत तिचे अढळ असे स्थान निर्माण झाले आहे. महिलांवरील अन्याय- अत्याचाराविरोधातही तिने वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यामुळे नांदेडच्या मातीतील या संघर्षकन्येची दखल विधानसभेतही घेतली गेली. मुख्यमंत्र्यांपर्यंत तिच्या आंदोलनाची धग पोहोचली आणि आशावर्कर, गट प्रवर्तकांच्या प्रश्नांकडे त्यांना सकारात्मक भूमिकेतून बघावे लागले. डावी चळवळ एकीकडे संपत आली असे म्हटले जाते, तर दुसरीकडे कॉ. उज्वला पडलवार याच चळवळीचे बोट धरून नाहीरे वर्गाचे यशस्वी नेतृत्व करते, याचा अर्थ डावी चळवळ संपली नाही आणि संपणार नाही याची साक्ष देते. येणारा काळ कोणाचा असणार आहे, हे सांगणे कठीण असले तरी न्याय हक्कांसाठी लढायांचा काळ नक्की असेल, हेही तेवच खरे!

Satyashodhak, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209