धरणगांव - जळगाव जिल्ह्यातील सत्यशोधक कार्यकर्ते या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार झाले. सत्यशोधक समाज संघातर्फे सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि सत्यशोधक समाज संघाच्या १५० सुवर्ण वर्षपूर्तीच्या निमित्त सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन नायगाव, तालुका खंडाळा येथे उत्साहात झाले. सर्वप्रथम सर्व महिला ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे घर व स्मारकाला अभिवादन करून नायगाव गावातील सरपंच साधनाताई नेवसे यांनी क्रांतीची मशाल घेऊन रॅलीची सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये सर्व बहुजन महामानव व महामातांच्या घोषणा दिल्या गेल्या. यानंतर रैली ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले सभा मंडपामध्ये आले. पहील्या सत्राच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज महिला संघाच्या अध्यक्षस्थानी वंदनाताई बनकर होत्या. प्रमुख वक्त्या स्मिताताई पानसरे, अँड वैशालीताई डोळस, सुजातालाई मुख, दर्शनाताई पवार, अँड. वासंती नलावडे, जेवूनिस्सा शेख उपस्थित होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून वैशालीताई पतंगे, स्वातीताई कोरी, मंजिरीताई घाडगे का आनंदी अवघडे, डॉ. कुंदाताई धुळे, मीनाक्षीताई राजेंद्र कुंभार, जयश्रीताई तांबे, विशेष निमंत्रित महिलांमध्ये निताताई जैवसे, सविताताई फाळके, सुनंदाताई जाधव, संगीताताई सूर्यवंशी, गायत्रीताई इरले, लताताई खाडे, सुनिताताई माळी, वैष्णवीताई राऊत, संगीताताई वसमाने उपस्थित होते सर्वप्रथम सावित्रीमाईंच्या लेकीनी खंडेरायाची तळी उचलून पहिल्या अधिवेशनाची सुरुवात केली. या अधिवेशनाचे प्रास्ताविक अर्चना तांबे, रिंपल जाधव यांनी केले. कल विचार मंचावरील सर्व महिलांअतिथींचे ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर प्रमुख महिला मान्यवरांच्या हस्ते सत्यशोधकीय में हचाचे ध्वजारोहण करण्यात आले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ह भ प विजय महाराज भोईरकर यांचे सत्यशोधकीय कीर्तन संपन झाले. यानंतर विचार मंचावरील प्रमुख महिला व त्यांनी विविध विषयांवर उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षता माननीय एडवोकेट वैशालीताई डोळस या होत्या. दुसन्या सत्रात प्राचीन भारताची क्रांतिकारी महिला कालांतराने गुलाम का झाली या विषयावर गटचर्चा करण्यात आली.
यानंतर सत्यशोधक समाज संघाच्या वतीने हरी नरके लिखित "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व पी डी पाटील लिखित "आदर्श महामाता पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या अधिवेशनात विविध पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आलेले होते. अधिवेशनाला आलेल्या महिलांनी हजारोच्या संख्येत पुस्तकाची खरेदी करून वैचारिक मेजवानी घेतली. सत्यशोधक समाज महिला संघाच्या वतीने विविध ठराव पारित करण्यात आले व सर्वांनी एकमताने मंजुरी देण्यात आली, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त सत्यशोधक बंधू- भगिनींनी सहकुटुंब सहपरिवार या नायगाव येथील ऐतिहासिक महिला अधिवेशनाचे साक्षीदार झाले यांचा मनस्वी आनंद आहे. सूत्रसंचालन माधुरी खैरनार, प्रतिभा महाजन तर आभार अनुरीता झगडे, व कु. श्वेता शिंदे यांनी केले.
सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव सुरेश झाल्टे, कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनाताई वनकर, स्वागत समिती अध्यक्षा साधनाताई नेवसे, कार्याध्यक्ष रुपालीताई इंगोले. संयोजिका शिवमती उज्वला तांबे. डॉ. डी.बी. रोडे, विधेकर्ते साबुबा पांडव, रामचंद्र भागवत, विजय तुल्हे, पी डी पाटील, कैलास जाधव, शिवदास महाजन, रमेश वराडे, कविराज पाटील तसेच सर्व सत्यशोधक समाज संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिवेशन यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.
Satyashodhak, Mahatma phule, Bahujan, Mandal commission, Savitri Mata Phule