दर्यापूर - लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता ओळखली जाते. हेच पत्रकारितेचे क्षेत्र सेवा म्हणून ओळखले जाते. परंतु या पत्रकारितेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या पत्रकारांवर राजकीय व प्रशासकीय अधिकारी नेहमीच अन्याय करत असतात. आपल्या लेखणीला धार असली आणि सत्य लिहिण्याची धमक असल्यास देशाची सत्ता झुकवण्याची ताकद पत्रकारितेत आहे. अपवाद वगळल्यास बहुतांश पत्रकार हे प्रामाणिकपणे काम करत असून, असतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत वक्ते प्रेमकुमार बोके यांनी केले. दर्यापूर येथील स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित दर्यापूर तालुका पत्रकार संघटनेच्या स्थापना प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोके बोलत होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार बबनराव शिरभाते, प्रमुख पाहणे म्हणून एस. एस. गजाननराव देशमुख, शशांक देशपांडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना बोके म्हणाले, अमेरिकेत राष्ट्रपती यांना थेट प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य पत्रकारांना आहे. परंतु, हेच स्वातंत्र आपल्या देशातील पत्रकारांना मिळाले नाही. देशाचे प्रधानमंत्री पत्रकाराच्या प्रश्नांना दहा वर्षांत सामोरे गेले नाही, हे देशातील पत्रकारांचे दुर्दैव आहे. असे मत या दरम्यान दर्यापूर तालुका पत्रकार संघटनेची स्थापना करत धनंजय धांडे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशांक देशपांडे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. धनंजय देशमुख यांनी केले. अमोल कंटाळे यांनी आभार मानले. या प्रसंगी विनोद शिंगणे, अजय वर, गणेश साखरे, अमोल कंटाळे, अनिल तायडे, प्रमोद होपळ, सै. नवेद, संदीप इंगळे, शांतरक्षक गवई, हरिदास खडे, सर्जिव बहुराशी, सोपान कुटेमाटे, गौरव टोळे, किरण होपळ, आदेश खांडेकर, धनंजय देशमुख, शीलवंत रायबोले, नासीर शहा आदींसह पत्रकार व
देश घडवण्याची क्षमता आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत असून पत्रकारांनी स्वतःला कमी न समजता आपले कार्य प्रभावीपणे रोखठोक केले पाहिजे, असे मत या प्रसंगी बबनराव शिरभाते, एस. एस. मोहोड, शरद रोहनकर, गजानन देशमुख यांनी व्यक्त केले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली.
Satyashodhak, Bahujan