'वंचित'ने वेगळी चुल मांडल्यास, आंबेडकरवादी 'विरोधकां' सोबत

भाजपला अप्रत्यक्ष होणारी मदत टाळण्याची भुमिका

     यवतमाळ - महाविकास आघाडीसोबत लोकसभाच्या जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे महाविकास आघाडीसोबत अजूनही एकसुर जुळल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ' वंचित' लोकसभेच्या तोंडावर पुन्हा २०१९ चीच भुमिका घेतली तर ? अशी शंका आंबेडकरी जनतेमधून व्यक्त केली जात आहे. मात्र २०२४ मध्ये निवडणुकीच्य माध्यमातून लोकशाही भक्कम करायची असल्याने कुठल्याही परिस्थितीत भाजपला फायदा व्हायला नको म्हणून जर स्वतंत्रपणे निवडणुक लढण्याचा निर्णय ‘वंचित'कडून झाला तर जिल्ह्यातील आंबेडकरी समाज महाविकास आघाडीच्या सोबत राहण्याची भुमिका वाघापुर, वडगाव, पिंपळगाव, उमरसरा, वैशालीनगर, लोहारा, भोसा या भागातील समाजबांधवांनी छोटेखानी बैठकांमधून स्वयंस्फुर्तीने घेणार असल्याची माहिती बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या आंबेडकरी अनुयायांनी दिली.

Ambedkarites with the maha vikas aghadi     सध्या देशात लोकशाही विरुध्द हुकुमशाही सत्ता संघर्ष निर्माण झालेला आहे. त्यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणुक ही लोकशाहीच्या अस्तित्वाची निवडणुक म्हणून पाहीले जात आहे. २०१९ मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढल्याने, आंबेडकरी मतदारांच्या विभागलेल्या मतांचा फायदा अखेर भाजपलाच झाल्याचे दिसुन आले. तेव्हा कुठल्याही परिस्थितीत २०२४ मध्ये आंबेडकरवादी विचाराच्या दिल्या जाणाऱ्या मतांचा वापर हा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे भाजपच्या फायदयासाठी होणार नाही, याची दक्षता विशेषतः आंबेडकरी मतदारांकडून घेतली जात आहे. तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे गटबंधन महाविकास आघाडीसोबत व्हावे अशी आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्यांची इच्छा आहे. मात्र जर जागा वाटपावरून ' वंचित' महाविकास आघाडीतून वेगळी झाली आणि स्वतंत्रपणे लोकसभा लढली तर मतदानात ‘वंचित’ च्या बाजुने उभे न राहण्याचा विचार मांडल्या जात आहे.

    तश्या स्थितीत ' वंचित' ला मत देवून भाजपला ताकद देण्याऐवजी महाविकास आघाडीच्या सोबत राहण्याची भुमीका आंबेडक जनतेकडून कॉर्नर बैठका घेवून समाजबांधवांसमोर मांडली जात आहे.

Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Indian National Congress, Bharatiya Janata Party, Republican Party of India
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209