वैदर्भिय कलावंतांना सामाजिक भावनेतून घडविणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चरल सेंटरची बांधिलकी

     अनिरुद्ध वनकर नावाचा कफल्लक कलावंताने आपल्या स्वकष्टाने भद्रावती येथील टाकळी या गावी अडीच एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चरल सेंटर नावाचे एक सांस्कृतिक केंद्र उभे केले आहे. यातून भद्रावतीच नव्हे तर देशभरातून सामाजिक बांधिलकी जपणारे कलावंत घडतील आणि राष्ट्र निर्माणात आपले योगदान देतील असा विश्वास या केंद्राने व्यक्त केला आहे.

     या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज खुल्या रंगमंचाची निर्मिती झाली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून या परिसराला नाव दिले आहे .क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले या नावाने ट्रेनिंग हॉल पूर्ण झालेला आहे. महात्मा गांधी झाडीपट्टी प्रदेश सांस्कृतिक मुंडा संग्रहालय, डॉ. अब्दुल कलाम सांस्कृतिक संशोधन केंद्र, वामनदादा कर्डक संगीत व नाटक कारखाना, बिरसा आदिवासी नृत्य लोककला विभाग, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय व अभ्यासिका केंद्र निर्माण होणार आहे.

    या संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचं केंद्र उभे झाले आहे. १३ जानेवारी रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळयाचे अध्यक्ष, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ना. विजय वडेट्टीवार राहतील.

    आ. प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून आ. सुधाकर अडबाले सीसीआरटी संस्कृती मंत्रालय भारत सरकार नवी दिल्लीचे चेअरमन डॉ. विनोद इंदुरकर प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहतील असे कळविण्यात आले आहे.

लोकांसाठी मोफत होणार ऐतिहासिक नाटक

     शनिवार १३ जानेवारी रोजी रात्री उद्घाटन सोहळ्यानंतर चुडाराम बल्हारपुरे यांनी लिहिलेले 'गोंडवानाचा महायोद्धा वीर बाबुराव शेडमाके ' हे नाटक मोफत रसिकांपुढे सादर होणार आहे. यामध्ये ३५ कलावंत कार्यरत असून या नाटकाचा निर्माता आणि दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर आहेत अनिरुद्ध वनकर आहेत. याप्रसंगी ३५ कलावंतांना प्रमाणपत्र वाटप होणार आहे. नाटक निशुल्क असल्यामुळे संध्याकाळी ७ वाजता उपस्थित रहावे असे आवाहन वनकर यांनी केले आहे.

Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209