येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागेसाठी तिसरी राजकीय आघाडी (घटक पक्ष) व राष्ट्रमाता अहिल्यादेवी समाज परिवर्तन आघाडी मिळून सर्वच्या सर्व जागेवर उमेदवार उभे करून निवडणूक लढविणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी घटक पक्षाचे नेते संजय कोकरे यांच्या ९२२४४४३११९ या मोबावर संपर्क साधावा, असे आवाहन बाबासाहेब लंबाटे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रमाता अहिल्यादेवी समाज परिवर्तन आघाडी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
संविधानाने कलम ३४२- ३६ ड वर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण दिलेले आहे. त्याप्रमाणे धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी कोणत्याही पक्षाचे राज्य आले तरी तो पक्ष धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी केंद्राकडे शिफारस करू शकत नाही त्यासाठी धनगर समाज व ओबीसी समाजाने कितीही आंदोलने, मोर्चे, उपोषण केले, तरी आरक्षणाची अंमलबजावणी होत नसते. त्यासाठी भीक नको, हक्काचे द्या असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. त्यासाठी महाराष्ट्रात तिसरी राजकीय आघाडी लोकसभेच्या व विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून निवडणूक लढविणार आहे. धनगर समाज, ओबीसी व अन्य समाज बांधवांनी हक्काचे आमदार व खासदार निवडून देऊन राज्य व केंद्र सरकारकडे धनगर समाजाचे एस.टी.चे आरक्षण अंमलबजावणी तसेच ओबीसी समाज जनगणनेची शिफारस करण्यात पाठपुरावा करतील असेही पत्रकात नमूद केले आहे. आजपर्यंत धनगर व ओबीसीच्या नेत्यांनी स्वतःचा स्वार्थ साधून समाजाला फसविले आहे. स्वार्थासाठी मोर्चे काढणे, उपोषण करून खासदार, आमदार, मंत्री झाले व समाजाला वाऱ्यावर सोडल्याचा त्यांनी पत्रकातून आरोप करून केंद्रात व राज्यात हक्काचे खासदार व आमदार निवडून देण्यासाठी तिसऱ्या आघाडीला मदत करण्याचे आवाहान केले आहे.