अमरावती दि. १० - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतून निवडणूक लढण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर सज्ज झाले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी जिल्ह्यातील जनसंपर्क वाढविला आहे. आनंदराज आंबेडकर हे १२ व १३ मार्चला जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. शहरासह जिल्ह्यातील विविध भागात भेटी देणार आहेत.
अमरावती एक्सप्रेसने मंगळवारी (ता. १२) सकाळी ८ वाजता त्यांचे अमरावती रेल्वे स्टेशन येथे आगमन, सकाळी ८ ते ११ राखीव, सकाळी १२ वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रपरिषद, दुपारी २ वाजता रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करतील. रात्री शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करणार आहेत. बुधवारी (ता. १३) सकाळी १०.३० वाजता समाधाननगर येथील बुद्धविहार येथे त्यानंतर ११.३० वाजता महादेवखोरी येथील परिसरातील कार्यकर्त्यांशी चर्चा, दुपारी २ ते ४ राखीव, दुपारी ४ वाजता फ्रेजरपुरा परिसरातील कार्यकर्त्यांची भेट, सायंकाळी पाच वाजता खल्लार येथे जाहीर सभेला संबोधीत करतील. पश्चात अमरावती येथून सोयीनुसार मुंबईला प्रस्थान करणार आहेत. खल्लार येथील सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनायक दुधे, विभागीय सचिव सतीश सियाले, जिल्हाध्यक्ष अनिल बरडे, धर्मेंद्र आठवले यांनी केले आहे.
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Republican Party of India