स्त्रियांनी स्त्रियांचा सन्मान करणं ही काळाची गरज आहे - राजश्री बोहरा

पी. सावळाराम साहित्य संमेलन डोंबिवलीत उत्साहात संपन्न

    डोंबिवली - महिलांनी महिलांचा सन्मान करणं ही काळाची गरज आहे. जात धर्म, गरीब - श्रीमंत हे भेद विसरून सर्व साहित्यिकांनी एकच विचाराने एकत्र येऊन साहित्याची चळवळ पुढे न्यायला हवी. तरच खूप मोठा बदल समाजात आणि साहित्य जगात घडून येईल असे मनोगत सुप्रसिद्ध साहित्यिक राजश्री बोहरा यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. त्यांनी संमेलनाध्यक्ष पद भूषविलेले हे १३ वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन होते.

women to respect women    अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद - मुंबई कल्याण डोंबिवली प्रदेश, महानगर विभाग आयोजित ३रे पी सावळाराम राज्यस्तरीय साहित्य संमेलन मराठमोळ्या संस्कृतीचा वारसा लाभलेल्या डोंबिवली नगरीत पार पडले. या संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून १०० पेक्षा जास्त प्रतिभावान साहित्यिक उपस्थित होते. त्याचबरोबर अनेक पत्रकारांनी या संमेलनाचा आस्वाद घेतला. संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिका हिरकणी राजश्री बोहरा ( अध्यक्षा मुंबई प्रदेश) यांची निवड करण्यात आली होती तर स्वागताध्यक्ष पदी नवनाथ ठाकूर (अध्यक्ष कल्याण डोंबिवली महानगर ) यांनी आपली भूमिका सांभाळली. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून लक्ष्मण शिवनेकर ( जेष्ठ गझलकार, शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य), जेष्ठ साहित्यिक जे आर केळुसकर ( माजी शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका),

    जेष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर ( संपादक दैनिक प्रहार ), जेष्ठ साहित्यिक श्री मारुती सावंत ( माजी मुख्याध्यापक बृहन्मुंबई मनपा) इत्यादी दिग्गज मंडळी उपस्थित होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. स्वाती हिरवे ( शिवसेना शहर संघटक डोंबिवली पूर्व), शशिकांत सावंत, अनिता गुजर, शोभा गायकवाड, गीतांजली वाणी. विठ्ठल घाडी, सुनील पवार, मुग्धा कुटे, राधिका बापट इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

    कल्याण डोंबिवली महानगर विभाग कार्यकारिणी संमेलनाचे आयोजक श्री नवनाथ ठाकूर- अध्यक्ष, हरिश्चंद्र दळवी - उपाध्यक्ष, स्मिता धुमाळ - उपाध्यक्ष, संदीप पाटील- उपाध्यक्ष व राजेन्द्र पाटील सह चिटणीस यांनी केले होते. लक्ष्मण शिवणेकर यांनी अशा स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. स्वतःची गझल सादर करून श्रोत्यांची मने भारावून टाकली.

    स्थानिक पातळीवरून आयोजित केले जाणारे असे साहित्य संमेलन खरे पाहता महाराष्ट्राचे व मराठी साहित्याचे वैभव आहे. याची दखल घ्यायला हवी असे मनोगत जेष्ठ पत्रकार श्री सुकृत खांडेकर यांनी व्यक्त केले.

    पीसावळाराम यांनी लिहिलेल्या ७०० हून अधिक रचना, ५०० हून अधिक गाजलेली त्यांची
चित्रपट गीत ही नाव कवींनी अभ्यासायला हवीत. त्यातून प्रेरणा घेऊन स्वतः देखील उच्च प्रतीचे दर्जेदार लेखन करावयास हवे असे मनोगत डॉ जे आर केळुसकर यांनी व्यक्त केले. तर माज्या अंगणातील तुळस का ग कोमेजली... अशा हृदयद्रावक रचनेतून श्री मारुती सावंत यांनी श्रोत्यांना गहिवरून टाकले.

    दीप प्रज्वलन ग्रंथ पूजा - गणेश वंदना शिवगर्जना पाहुण्यांचे स्वागत पुस्तक पुरस्कार सोहळा - प्रकाशन परिसंवाद कविसंमेलन लकी ड्रॉ सहभोजन असा भरगच्च आणि दजेदार कार्यक्रम या निमित्ताने पहावयास मिळाला. अतिशय उल्लूहासाने आणि चैतन्याने भारावलेल्या वातावरणात 75 कवींनी आपली कविता सादर केली. साहित्य, शिक्षण, कला आणि सामाजिक क्षेत्रातून अतुलनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींचा सन्मान विविध राज्यस्तरीय पुरस्कार देऊन करण्यात आला. नेत्र दीपक सन्मानचिन्ह (ट्रॉफी) सन्मानपत्र, गोल्ड मेडल, पुष्प देऊन गौरविण्यात आले.

    मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावत साजरे झालेले हे कवी संमेलन कायमच स्मरणात राहिले.

Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209