तलासरी : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे तलासरी तालुका अधिवेशन गुरुवार दिनांक ७ मार्च २०२४ रोजी संपन्न झाले. कॉम्रेड गोदावरी परुळेकर कार्यालय, येथे हे तालुका अधिवेशन झाले. अधिवेशनास जमस च्या जिल्हा कोषाध्यक्ष व तलासरी पंचायत समिती सभापती कॉ.सुनीता शिंगडा हिने उद्घाटन केले. एसएफआयचे जिल्हासचिव भास्कर म्हसे यांनी मार्गदर्शन केले.व डीवायएफआय युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष व तलासरी पंचायत समिती उपसभापती कॉ.नंदकुमार हाडळ यांनी अधिवेशनास शुभेच्छा दिल्या. या अधिवेशनात २३ सदस्यांची एसएफआयची नवीन तलासरी तालुका कमिटी निवडण्यात आली.
एसएफआयचे नवीन तलासरी तालुका अध्यक्ष म्हणून राहुल भोये आणि तालुका सचिव म्हणून संगिता गौतम यांची निवड झाली. उपाध्यक्ष म्हणून संतोष कोम तर सहसचिव म्हणून सिद्दी सुरती, कोषाध्यक्ष सुरज मदेशिया यांची तर सचिव मंडळ सदस्यपदी पूजा कामडी, सुभाष गावित, करुणा फडवले, अजित गायकवाड,शालू यादव, व प्रतीक वेडगा यांची निवड झाली आहे. तालुका कमिटीचे सदस्य म्हणून अंकिता शेलार,शुभांगी घुटे, दिशा मेहेर, राधिका शाहू, शुभांगी राबड, सोनू वाढया, मोनिका पडवले, नेहा मंडळ, ईशा भोये, शिवा धोडी, रोहित पाडवी, निखिल चौरे, कल्पेश थापड आदींची निवड झाली आहे.
या अधिवेशनात तालुक्यातील वेगवेगळ्या कॉलेज मधून विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी झाले होते. तालुका अधिवेशनाचा समारोप नवीन सचिव आणि अध्यक्ष यांच्या मनोगताने करण्यात आला. नवनिर्वाचित एसएफआय तालुका नेतृत्वाचे अभिनंदन करून अधिवेशनाची सांगता झाली.
Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Karl Marx, Mandal commission