इतर मागास बहजन कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांसाठी विविध हिवाळी अधिवेशनात ३ हजार ३७७ कोटींच्या पुरवणी मागण्यांना मिळाल्याची इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.
ओबीसी महासंघाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सामाजिक न्याय भवन येथे अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार परिणय फुके, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, सचिन राजूरकर, शेषराव येलेकर, शरदराव वानखेडे, सुभाष घाटे, दिनेश चोखारे, रामदास कामडी यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते. त्यांनी सांगितले की, २०२३ - २४ च्या योजनांसाठी ७८७३ कोटींची तरतूद करण्यात आली होती. ओबीसी विभाग स्थापन झाल्यानंतर एका वर्षांसाठी झालेली ही विक्रमी तरतूद आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ३०८१ कोटी अधिक आहेत. या निधीतून मोदी आवास योजनेसाठी १ हजार कोटींची तरतूद आहे. महाज्योतीसाठी २६९ कोटी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी १५८ कोटी, धनगर समाजाच्या योजनांसाठी ५६ कोटी, अमृत संस्थेसाठी १५ कोटी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ११९२ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय राज्य मागासवर्ग आयोगासाठी ३६० कोटी, ओबीसी व व्हीजेएनटी महामंडळासाठी २० कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील लाभार्थ्यांना शैक्षणिक व सामूहिक विकास कामांसाठी हातभार लागेल, असा विश्वास सावे यांनी व्यक्त केला.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission