जत दि. ७ डिसेंबर २०२३ - जत तालुक्यातील ओबीसीं समाजाचा जत तहसील कार्यालयावर ओबीसी नेते मा.छगन भुजबळ साहेब यांना पाठबळ देण्यासाठी प्रचंड भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाच्या तयारीसाठी जत तालुक्यातील गावो गावात जोरदार तयारी करण्यात आली होती. जत तालुक्यातून मोर्चा तयारी साठी तुकाराम माळी, महादेव पाटील, जे.के.माळी,,शंकरराव वगरे,जे.के.माळी,साहेबराव टोणे ,उत्तम म्हारणूर,बंडू डोंबाळे,दाजी पाटील,तायाप्पा वाघमोडे,लक्ष्मण पुजारी आदीनी नियोजन पूर्वक प्रचारात भाग घेतला होता. जत तालुक्यातील ओबीसी नेत्यांनी आपल्या भागात बैठका आयोजित करून मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी सहकार्य केल्यामुळे मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
१) ओबीसी अस्मिता मा.ना.छगणराव भुजबळ साहेब ओबीसी नेते यांचेवर एकतर्फी टीका,टिप्पणी,अस्लिल मजकूर,धमकी देणे थांबवावे.
२) मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण संविधान मार्गाने न्यालयात टिकणारे देण्यात यावे.
३) जात निहाय जनगणना करण्यात यावी.
४) मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी त्वरित लागू करण्यात याव्यात.
५) अनुसूचित जाती,जमाती आरक्षणप्रमाणे ओबीसी आरक्षणाला घटनात्मक दर्जा द्यावा.
६) असंवैधानिक क्रिमीलेअर अट रद्द करावी.
आदी प्रमुख मागण्यासाठी प्रचंड मोर्चा जत तहसील कार्यालयावर जत तालुका सकल ओबीसी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा मध्यें मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी होऊन महाराष्ट्र राज्यात ओबीसी प्रवर्गावर होणाऱ्या अन्याला वाचा फोडाली.
मनोज जरंगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी येथे २८ आगस्ट २०२३ रोजी मराठवाड्यातील निजाम कालीन कुणबी नोंदी शोधून दाखले द्यावेत म्हणून उपोषण सुरू केले. सरकारी प्रशासन, गुप्तचर यंत्रणा, ही अपयशी ठरल्याने सरकारने बळाचा उपयोग केल्यामुळे १ सप्टेंबर २०२३रोजी आंदोलनाला हिंसक वळण लागून उपोषणकर्ते जरांगे पाटील यांना सहानुभूती मिळून मराठा समाज जरांगे यांच्या रुपाने एकवटला.मराठवाड्यातील मराठा समाज कुणबी नोंदी शोधून ओबीसी सवलती मागत होता. सरकारने विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या मागण्या आरक्षण सुविधा ह्या आदीच सराफ आयोगाने २००४ साली कुणबी मध्ये विस्तार करून कुणबी मराठा आणि मराठा कुणबी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांनीच सुविधा सुरु केली होती. त्याप्रमाणे आरक्षण लाभ मिळत आहे. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण मिळत आहे. कोणतीही मागणी मान्य न करता आणि त्या दिशेने वाटचालीस सुरु न केल्यामुळे समाजा समाजात अस्वथता निर्माण झाली आहे.मूळ ओबीसी वर्गाना महाराष्ट्र सरकार पक्षपाती असून दोन समाजात भांडणे लावित आहेत असे वाटू लागल्यामुळें फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्र राज्यात महापुरुषांचे विचार नष्ट करण्याचे उद्योग सरकार करीत आहे असे वाटू लागले आहे.१४ सप्टेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने ३० दिवसाच्या मुदतीवर उपोषण मागे घेतले. प्रत्यक्षात चाळीस दिवस मुदत देऊन परत २५ आक्टोबर २०२३ रोजी दूसरे वेळा उपोषण सुरु झाले आणि ३० आक्टोबर २०२३ रोजी बीड,आणि माजलगाव येथे हिंसक दंगली होऊन दहशत निर्माण करण्यात आली. आणि २ नोव्हेंबर २०२३ रोजी नऊ दिवसांनी उपोषण मागे घेण्यात आले. जो मराठा समाज १३ जुलै २०१६ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावातील समाज कंटकानी निर्दयीपणे माणुसकीला काळीमा फासणारा निर्भयावर अत्याचार करून खूण केला.तेव्हा समाजाने शांतता मार्गाने ५८ प्रचंड मूक मोर्चे काढले. मराठा समाजाला आरक्षणासाठी शांतता पूर्ण मार्गाने मोर्चे काढण्यात यश आले. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील सामाजिक वातावरण गडूळ झाले आहे. ते सरकारने एकमुखाने हताळून कायदा आणि सुव्यवस्था निकोप ठेवावी.
महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ ने छगन भुजबळ साहेब यांच्याविषयी नकारात्मक भूमिकेतून चालले बदनामीमुळे ओबीसीं समाजाचा भावना तीव्र झाल्यामुळें ओबीसी बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
मोर्च्याने जत तहसील कार्यालय आवारात एल्गार सभेत रुपातंर झाले. सभेत ओबीसीं नेते प्रकाश आण्णा शेंडगे, शंकरराव लिंगे, लक्ष्मण हाक्के, संजय विभुते, तुकाराम माळी, महादेव पाटील, जे. के. माळी, शंकरराव वगरे, साहेबराव टोणे ,उत्तम म्हारणूर, बंडू डोंबाळे, दाजी पाटील आदीनी संबोधित केले.