ओबीसी महिला शक्ति जोपर्यत एकवटनार नाही तोपर्यंत ओबीसी समाजाचे प्रश्न सुटणार नाही या देशात जनावरांची गनना होते पण या देशातील ६०% ओबीसी ची जनगनना होत नाही, आम्ही लोकप्रतिनिधी असुनसुद्धा सभागृहात ओबीसी ची लक्षवेधी लागेल किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे असे उद्गार राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे उद्घाटन करतांना भद्रावती वरोरा निर्वाचन क्षेत्रांच्या आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले, या अधिवेशनाचे दिपप्रज्वलन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे ह्यांचे सोबत अध्यक्षा सुषमा भड, कार्याध्यक्ष डॉ शरयु तायवाडे, उपाध्यक्ष अँड रेखाताई बारहाते, प्रदेशाध्यक्ष कल्पना मानकर, विनोद गुध दे पाटील, विदर्भ अध्यक्षा विजया धोटे, शहराध्यक्ष वृंदाताई ठाकरे, अँड समिक्षा गणेशे, रुतिका डाफ, साधनाताई बोरकर, मंचावर उपस्थित होत्या. या अधिवेशनाचे निमित्ताने अँड ज्योती ताई ढोकणे, यांनी सुदृढ ओबीसी समाजासाठी सक्षम होने गरजेचे आहे. ओबीसी समाजाला कुणाच्याही दडपशाहीला न घाबरता ओबीसी समाजाने अधिकारासाठी संविधानिक आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. या सत्राच्या दुसऱ्या वक्त्या संध्याताई सराडकर यांनी संविधानाच्या समतेची व्यवस्था निर्माण करावी लागेल व ओबीसी महिलांना ३३% आरक्षण मिळालेच पाहिजे. असे मत व्यक्त केले. या प्रसंगी ओबीसी योध्दा रविंद्र टोंगे, विजय बल्की, प्रेमानंद जोगी यांचा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे आणि सुषमा भड यांचे वतीने महिला महासंघा तर्फे सत्कार करण्यात आला. या नंतर अँड जयश्री शेळके, यांनी आम्हा महिलांनी इतिहास घडविण्याचे कार्य करण्याची गरज आहे.
ओबीसी महीला म्हणून आमच्याकडे इतिहास पुरुषांनी फार मोठी जवाबदारी दिली आहे ती आम्हाला स्विकारावी लागेल. डा पंजाबराव देशमुखांचे आभार महिला म्हणून आम्हाला स्विकारावे लागेल. या प्रसंगी अर्चना ताई भोमले यांनी संघटनेच्या एकसुत्रेबाबत मत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ बबनराव तायवाडे ह्यांनी सांगितले की आम्हाला संविधानिक लढाई लढायची आहे. ते अधिकार मिळविण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जन्म झाला आहे, आरक्षण मिळाले च आहे पण ते मिळविण्यासाठी संघर्ष संघटीत होऊन करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाला शक्ती देणे हे आपले कर्तव्य आहे. ध्येय आणि उदिष्ट स्पष्ट असावयास पाहिजे. तरच आपण यशस्वी होऊ. दक्षिणेच्या राज्यात ओबीसी वस्तिगृह होऊन वर्षे झाली परंतु महाराष्ट्रात ओबीसी वस्तिगृह अजुनही नाही, हा ओबीसी समाजाचा अपमान सरकार करीत आहे. या प्रसंगी विचार पेहरावांचा हा कार्यक्रम घेण्यात आला यात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा पेहराव विद्याताई सोनुले यांनी तर इतरांमध्ये रत्नमाला पिसे, तरुष राऊत बालशिवाजी जिजामाता विणा राऊत, एच गुंजन सावित्रीबाई फुले, निशा हटवार बहिणाबाई चौधरी, सुनिता रामटेके ताराबाई शिंदे, इत्यादी विविध महिलांनी अनेक ऐतिहासिक पात्राची भूमिका सादर केली संचलन पुजा मानमोडे यांनी केले. या कार्यक्रमानंतर संविधानाचा जागर हा कार्यक्रम पार पडला.
खर्या अर्थाने राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे अधिवेशन यशस्वी झाले, भुमिका सुषमा भड यांनी मांडली, अधिवेशनाचे प्रस्ताविक अँड रेखाताई बारहाते, कार्यक्रमाचे संचलन अरुणा भोंडे यांनी केले आभार शुभांगी घाटोळे, यांनी केले. या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी अनेक ओबीसी महिलांनी तसेच अनेकांनी आर्थिक सहकार्य करुन अधिवेशन यशस्वी केले.