वडिगोद्री : येथून जवळच असलेल्या अंतरवाली सराटी येथे संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाची शाखा स्थापन करण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष अॅड. ज्ञानेश्वर गावडे, महासचिव ताराचंद पवार यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
बळीराम रोडी यांची ओबीसी महासंघाचे वडिगोद्री सर्कलप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी प्रमोद रोडीं, बाबासाहेब दखने, रामेश्वर सोलंकर, बाळू बिबे, अशोक रोडी, संजय दखणे, गोकुळ दखने, मनेश टोपे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष अॅड. ज्ञानेश्वर गावडे यावेळी म्हणाले की, संविधानिक आरक्षणात कोणतीही जात दुसऱ्याचा जातीचा सहभाग खपवून घेत नाही. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नसून त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. केंद्र शासनाने ५०% आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचे बिल आणुन स्वतंत्र आरक्षण द्यावे. परंतु ओबीसीच्या ४०० जाती समुहात दुसरा वाटेकरी ओबीसी समाज सहन करणार नाही, यावर शासनाने तोडगा काढला पाहिजे.
धनगर समाजाला अनुसचित जमातीमधून आरक्षण द्यावे. धनग आणि धनगर या शब्दावरून सध्या महाराष्ट्रातील धनगर आरक्षण रखडले आहे. महाराष्ट्रात धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. धनगर आरक्षणासाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने विविध मार्गांनी केली जात आहे. या आंदोलनाची दखल घेउन शासनाने धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा सचिव ताराचंद पवार यांनी दिला. ओबीसी महासंघाचे वडीगोद्री सर्कल प्रमुख बळीराम रोडी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रवीण आदलिंगे, राजेंद्र कोटंबे, भारत खडके, भागवत रोडी, दर्शन कोटंबे, रामेश्वर भागवत, रामेश्वर चौधरी, अवधूत वंगळ, अनिल भागवत, श्याम वाघमारे, अमोल साक्रुस्कर, भारत कातकडे, आदित्य वरकड, आकाश दखने, अर्जुन रोडी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan, Mandal commission, Vishwanath Pratap Singh, Savitri Mata Phule