हिंगणा : समता सैनिक दल व श्रावस्ती बुद्धविहार शाखा राजीव नगरच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी 'एक नोटबुक, एक पेन' उपक्रम राबवून महामानवाला अभिवादन करण्यात आले.
यावेळी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केल्यानंतर घनश्याम फुसे, मुन्ना डहाट यांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली. बुद्धविहार कमिटीचे कमलदास कांबळे, हिम्मत बर्डे, रत्नाकर गजभिये, संजय शेवारे, नवनाथ उके, सुरेंद्र डोंगरे, राहुल धाबर्डे यांनी मार्गदर्शन केले. गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांकरिता एक नोटबुक एक पेन उपक्रम राबविण्यासाठी दात्यांकडून २५ हजारांचे नोटबुक, शैक्षणिक साहित्य व पेन गोळा करण्यात आले. समता सैनिक दलाच्या शीतल बर्डे, सरिता वानखडे, अविनाश मेश्राम, मिलिंद बर्डे, दादू वैद्य, तन्मय गजभिये, धम्मा वागदे, राहुल डोंगरे, संजू नागदेव, आशिष कांबळे, सुमित सांगळे, आदित्य शेंडे, डॉ. चव्हाण, पूजा कांबळे, मुन्ना बागडे, नलिनी तभाने, अमित कठाने, शुभम नंदागवळी, प्रणय नंदागवळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अॅड. तुफान कांबळे यांनी केले.