ओबीसीमधून आरक्षण न देता स्वतंत्र बिल आणा

ॲड. ज्ञानेश्वर गावडे, अंतरवाली सराटीत ओबीसी महासंघाची शाखा स्थापन

     वडीगोद्री ता. २७ : संविधानिक आरक्षणात कोणतीही जात दुसऱ्याचा जातीचा सहभाग खपवून घेत नाही. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नसून त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. केंद्र शासनाने ५०% आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचे बिल आणुन स्वतंत्र आरक्षण द्यावे. परंतु ओबीसीच्या ४०० जाती समुहात दुसरा वाटेकरी ओबीसी समाज सहन करणार नाही, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष अॅड. ज्ञानेश्वर गावडे यांनी केले.

Bring a separate bill for maratha aarakshan - Dont Give Enterye marathas OBC aarakshan    अंतरवाली सराटी येथे रविवारी (ता. २६ ) संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाची शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बळीराम रोडी यांची ओबीसी महासंघाचे वडीगोद्री सर्कल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

    धनगर समाजाला अनुसचित जमातीमधून आरक्षण द्यावे. धनगड आणि धनगर या शब्दावरून सध्या महाराष्ट्रातील धनगर आरक्षण रखडले आहे. तरी शासनाने लवकरात लवकर धनगर समाजाला आरक्षण द्यावे. नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जालना जिल्हा सचिव ताराचंद पवार यांनी सांगितले. यावेळी ओबीसी महासंघाचे वडीगोद्री सर्कल प्रमुख बळीराम रोडी म्हणाले की, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यात काम करणार आहे असे रोडी यांनी सांगितले.

     यावेळी प्रमोद रोडीं, बाबासाहेब दखने, बाळासाहेब दखने, रामेश्वर सोलंकर, बाळू बिबे, अशोक रोडी, संजय दखने, गोकुळ दखने, मनेश टोपे, राजेश टोपे, प्रवीण आदलिंगे, राजेंद्र कोटंबे, भारत खडके, भागवत रोडी, दर्शन कोटंबे, रामेश्वर भागवत, रामेश्वर चौधरी, अवधूत वंगळ, अनिल भागवत, श्याम वाघमारे, अमोल सानुस्कर, भारत कातकडे, आदित्य वरकड, आकाश दखने, अर्जुन रोडी उपस्थित होते.

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209