वडीगोद्री : मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देण्यासाठी शासनाने ७ सप्टेंबर २०२३ रोजी काढलेला शासन आदेश (जी. आर. ) ताबडतोब रद्द करण्यात यावा. न्यायमूर्ती शिंदे समिती तत्काळ रद्द करावी, मराठा समाज बांधवांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देणे तत्काळ रद्द करावे, जात निहाय जनगणना करण्यात यावी. ओबीसी कोट्यातुन मराठा समाजास आरक्षण देऊच नये, या मागणी साठी वडीगोद्रीसह परिसरातील ५० ते ६० गावातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने वडीगोद्री ते अंबड तहसील कार्यालयपर्यंत दुचाकी रॅली काढली. तर वडीगोद्री येथे दिनांक ५ डिसेंबर उद्यापासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. यामागणीचे निवेदनओबीसी समाजाच्या वतीने अंबडचे तहसीलदार मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. सदर निवेदन नायब तहसीलदार धनश्री भालचिम यांना देण्यात आले.