कोरेगाव, ता. २०. महाराष्ट्रात ओबीसींवर आलेले संकट दूर करण्यासाठी छगन भुजबळ ओबीसींची एकजूट करत आहेत. जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने त्यांचे हात बळकट करण्यासाठी तालुकानिहाय ओबीसींचे मेळावे घेऊन समाजात जागृती करूया, असे आवाहन महाबळेश्वर तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अनिल लोहार यांनी केले.
कोरेगाव तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यात श्री. लोहार बोलत होते. जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी श्री. लोकरे, संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सुनीता लोहार, जिल्हा महासचिव प्रमोद क्षीरसागर, सातारा तालुका ओबीसीचे अध्यक्ष वैभव गवळी, प्रकाश जाधव, माणिक हजारे, तेजस्वी पवार, मनीषा गायकवाड, सुमन पवार यांनी भाषणांत ओबीसी समाजात आज जागृती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
तालुक्यात ओबीसी संघटन करण्यासाठी दहा समन्वयकांची निवड केली. त्यांना पत्र देऊन त्यांचा सत्कार केला. अमोल भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. उद्धव करणे यांनी आभार मानले.
यावेळी जयसिंग लोखंडे, जगन्नाथ कुंभार, किशोर काशीद, रमेश पवार, जीवन काशीद,
दत्तात्रय चव्हाण, दत्तात्रय क्षीरसागर, रामदास मोहिते, महेंद्र काशीद, रामचंद्र माने, राजेंद्र पिसाळ, अमोल करणे, सोपान जगताप, मारुती काशीद, दत्तात्रेय सपकाळ, सरपंच गुलाबराव सुतार, दयानंद गायकवाड, सयाजी काकडे, भरत काकडे, संतोष खिलारे, भीमराव कानडे, नामदेव शिंदे, जितेंद्र वाघ, तालुक्यातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सरपंच उपस्थित होते.