राजापूर - लोकसभा, विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या व अन्य विविध निकामध्ये समाजावर निवडून येणारे लोकप्रतिनिधी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा उभारताना दिसत नाहीत. त्यामुळे भविष्यामध्ये ओबीसी समाजाचे हित जपणार नाहीत, अशा कोणत्याही व्यक्तीला आम्ही मतदान करणार नाही, असा निर्धार झालेल्या ओबीसी संघर्ष समिती राजापूरया सभेमध्ये करण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा अजिबात विरोध नाही, मात्र ओबीसांच्या आधीच तुटपुंज्या असलेल्या आरक्षातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास त्याला आमचा विरोध राहील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात अपने या अनुषंगाने लवकरच जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करून त्याला ओबीसी आरक्षण कायम राहाण्यासाठी लढा देणारे एकमेव मंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रित करण्याचे या वेळी निश्चित करण्यात आले.
ओबीसी संघर्ष समिती, राजापूरच्या पारिणीसह विविध राजकीय पक्षांमधील ओबीसी संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या पदाधिकान्यांची रविवारी नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये समितीचे तालुकाध्यक्ष महेश शिवलकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाध्यक्ष शरदचंद्र गीते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा झाली. या वेळी व्यासपिठावर ओबीसी नेते पांडुरंग उपळकर, जयप्रकाश नार्वेकर, अनिल करगुटकर, प्रकाश मांडवकर, दीपक नागले, प्रकाश कुवळेकर, रवींद्र नागरेकर, अॅड. शशिकांत सुतार आदी मुख पदाधिकारी उपस्थित होते.
अॅड. सुतार यांनी सभा आयोजनाची नस्तावना करताना सर्वांनी राजकीय मतभेद विसरून ओबीसी आरक्षण आणि ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सान्यांना संघटित होण्याचे आवाहन केले. श्री. माडकर यांनी बोलताना ओबीसी समाजाची मोजणी करण्याचे धारिष्ट्य शासन दाखविणार कधी, असा सवाल उपस्थित करताना ओबीसी आरक्षणासंबंधित राजकीय पक्षाच्या बदलत्या भूमिकाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली, तर श्री. नावेकर यांनी बोलताना ओबीसी समाजाला आता आपली ताकद दाखविण्याची गरज असल्याचे मत मांडले. श्री. उपळकर यानी ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याची मागणी करताना ओबीसी चळवळीमध्ये जास्तीत जास्त तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन केले. श्री. शिवलकर यांनी बोलताना ओबीसी संघटनाचे महत्व विषद करताना लवकरच विभागवार बैठका घेऊन तालुकास्तरीय मेळावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. तर श्री गीते यांनी ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना ओबीसी चळवळीमध्ये सर्व समाजघटकांनी संघटित होण्याचे आवाहन केले.
यावेळी श्री. नागले, श्री. पाजवे, श्री.करगुटकर, श्री. नागरेकर, संतोष हातणकर, गोपाळ गोंडाळ आदींनी मार्गदर्शन केले. या सभेला मोठ्या संख्येने कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission