मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष फोडीच्या राजकारणासोबतच घरफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली असुन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी ओबीसी मराठा वाद पेटवला जात आहे याविरोधात मराठी माणसाच्या हितासाठी जवळपास चाळीस पेक्षा जास्त पक्ष एकत्र आले असून ओबीसी एनटी पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष संजय धाकु कोकरे यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे या स्वराज्य उभारणीत त्यांना इस्रा चे गजाननभाऊ शिरसाट, यांची साथ लाभली असून अमृता भंडारी संस्थापक नॅशनल सोशालिस्ट पार्टी तसेच राष्ट्रीय अध्यक्ष मनोज काळसेकर यांनी पाठिंबा दिला आहे. मनोज काळसेकर यांनी नुकतेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या बारा मागण्यांसाठी आमरण उपोषण करून उठावाचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी तिसऱ्या राजकीय आघाडीची मोलाची साथ मनोज काळसेकर यांना लाभली असून शेतकरी कष्टकरी कामगार उपेक्षित वंचित घटकांसाठी ही आघाडी स्थापन झाल्या मुळे या यादीत रोजच भर पडत आहे. ही यादी नोंदणीकृत राजकीय पक्षांची असुन दुसरी यादी सामाजिक संघटनांची लवकरच जाहीर होईल असे सांगण्यात आले, ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया, नॅशनल सोशालिस्ट पार्टी (राष्ट्रीय समाजवादी पार्टी), न्यु राष्ट्रीय समाज पक्ष, समता पार्टी, बळीराज्य पार्टी, रिपब्लिकनय पक्ष ( खोरीप), लोकराज्य जनता पार्टी, राष्ट्रमाता अहिल्यादेवी समाज परिवर्तन आघाडी, महाराष्ट्र प्रगतीक पक्ष, बहुजन क्रांती पक्ष, बहुजन जनता दल, वंदे मातरम सेना, भारतीय लोकशक्ती पार्टी, संघर्ष सेना, भारतीय प्रजा सुराज्य पक्ष, रिपब्लिकन पक्ष ( कांबळे गट), स्वराज्य शक्ती सेना, बहुजन जनता दल, महाराष्ट्र विकास सेना,भारतीय राष्ट्रवादी पार्टी, प्रागतिक पक्ष, अपनी प्रजाहीत पार्टी, आग्री सेना