निमगाव केतकी, ता. १४ ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा मागणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दमदाटीची भाषा करणाऱ्या आणि खालच्या पातळीवर बोलणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी विधानसभेत एक चकार शब्दही का काढला नाही, असा सवाल करत भुजबळ यांना शासनाने झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी इंदापूर तालुका माळी परिषदेचे अध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव यांनी केली. विधानसभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्री भुजबळ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केल्यानंतर चव्हाण यांच्यासह त्यांची बाजू उचलून धरणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार बच्चू कडू व भास्कर जाधव यांचा गुरुवारी (ता. १४) निमगाव केतकी येथील श्री संत सावता माळी चौकात इंदापूर तालुका ओबीसी बांधवांच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी यादव बोलत होते.
यादव म्हणाले, श्री भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ९ डिसेंबर रोजीओबीसींचा जो प्रचंड मोठा महामेळावा झाला ते सहन न झाल्याने वरील चार नेत्यांनी भुजबळ यांच्या विषयी वक्तव्य केले आहे.
यावेळी सावता परिषदेचे प्रदेश संघटक संतोष राजगुरू व महादेव पाटील यांनीही झालेल्या घटनेचा निषेध केला.
यावेळी देवराज जाधव, दशरथ डोंगरे, दत्तात्रेय शेंडे, तुकाराम करे, बजरंग राऊत, ऍडव्होकेट श्रीकांत करे. सचिन राऊत, संदीप भाँग, बबन खराडे, सुभाष भोंग, माणिक भाँग, दादा पाटील, संतोष गदादे, विक्रम जगताप, माणिक ननवरे, विजय पाटील, मारुती धनवट चंद्रकांत शेंडे, सागर ढगे, अमोल चांदणे, तात्या जगताप, शंकर
भोसले, लक्ष्मण फरांदे, काशिनाथ भोंग, वीरनाना रासकर यांची उपस्थिती होती.