कळंब : धाराशिव येथे गुरुवारी (दि. ३०) होणाऱ्या धनगर एस. टी. आरक्षण अंमलबजावणी विराट मोर्चाच आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या जनजागृतीसाठी सकल धनगर समाजच्या वतीने कळंब तालुक्यातील गावोगावी घोंगडी बैठक आयोजित करण्यात येत आहे. धनगर एस टी आरक्षण न्यायालयीन लढाई विषयी महारानी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, मुंबईचे संचालक (मराठवाडा विभाग) डॉ रामकृष्ण लोंढे यांनी सविस्तर माहिती दिली. येत्या ३० नोव्हेंबरला धाराशिव येथे जिल्हाधिकारी कचेरीवर धनगरांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यातून जवळपास एक लाख धनगर बांधव या विशाल महामोर्च्यात सहभागी होतील असा अंदाज संयोजकांतर्फे व्यक्त केला जात आहे. या संबंधी प्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष प्रा. सोमनाथ लांडगे यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी दिनेश बंडगर यांनी तालुका स्तरावरील नियोजन कसे केले आहे. या विषयावर मत मांडले, गणेश एडके यांनी गाव पातळीवर जाऊन मोर्चासाठी नियोजना विषयी मार्गदर्शन केले, डॉ. स्नेहा सोनकाटे म्हणाल्या की निवडनुकापूर्वी जर आरक्षण मिळाले नाही तर धनगरांची मते निर्णायक ठरू शकतात असे विचार मांडले.