मौदा ता. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झालीत पण भारतीयांची परिस्थिती गुलामसारखी या देशातील राज्यकर्त्यांनी केलेली आहे. देशातील शेतकरी व तरुण आत्महत्या करतो, तरुण बेरोजगार आहेत. राज्यातील 62000 शाळा शासन बंद पाडत आहेत. ओबीसीची जनगणना व 72 वसतिगृहाचा प्रश्न कायम आहे. गरिबी, भूकमरी, कुपोषण ह्या समस्या आतापर्यंत संपल्या नाहीत. असे मत जगदिश वाडिभस्मे यांनी मांडले.
याप्रसंगी जगदिश वाडिभस्मे प्रमुख वक्ते म्हणून तर अध्यक्ष म्हणून भोजराज गभने उपस्थित होते. उद्घाटन शिलवंत रंगारी यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रवी चरडे, सचिन तिघरे, अभ्यंकर बोरकर उपस्थित होते. 26 नोव्हेंबर 2023 रविवारला निहारवानी, त. मौदा, जि. नागपूर येथे महापुरुषांना अभिवादन करून प्रबोधनात्मक व्याख्यान व गीताचा कार्यक्रम तथागत बुद्ध विहार समिती, निहारवानी मार्फत आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन राहुल दहिवले यांनी केले व आभार प्रदर्शन किरण खोब्रागडे यांनी केले. तसेच सोनाली गायधने, दीपाली वासनिक, रोशन गजभिये, मनोज गोस्वामी, व्यंकट गजभिये, बाबूलाल दहिवले, घनश्याम दंडारे, रोशन गायधने, प्रदीप गिऱ्हेपुंजे, अर्जुन घुबडे, आशिष मानकर, गायत्री बेलेकर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.