अहमदनगर : स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही त्रिसूत्री भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. राज्यघटनेमुळे प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क मिळाला. यामुळेच देशातील लोकशाही भक्कमपणे उभे आहे. आज देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांची गरज आहे. असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे यांनी केले आहे.
माळीवाडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्व हिंदू परिषदेतर्फे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे शहरमंत्री श्रीकांत नांदापुरकर, मठमंदिर समितीचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ डोळसे, सामाजिक समरसतेचे उपाध्यक्ष बाबासाहेब साठे, शहर
प्रमुख सचिन लोखंडे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, ओबीसी व्हिजेएनटी जनमोर्चा चे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, श्रीकांत फंड मनोहर भाकरे, भानुदास बनकर , सामाजिक कार्यकर्ते सुनील सकट आदी उपस्थित होते.