चंद्रपूर : सर्व मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती जमाती मधील नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण करणाऱ्या दोन अधिसूचना महाराष्ट्र सरकारने मागे घ्याव्या तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी चंद्रपुरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज बुधवार दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेदरम्यान मोर्चा काढण्यात आला.
ओबीसी समाजबांधव, अनुसुचित जाती- जमाती तसेच भटक्या विमुक्त जातीच्या विविध संघटनांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चामध्ये जिल्ह्याभरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाच्या मार्गावर विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटनांनी पेंडाल टाकून मोर्चाचे स्वागत केले. तसेच या मोर्चाला आपला पाठींबा दर्शविला.
महाराष्ट्र शासनाने दि. २७ डिसेंबर २०२३ व २६ जानेवारी २०२४ रोजी आरक्षणाच्या संदर्भात दोन अधिसुचना काढल्या. या अधिसुचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यास जातीचे खोटे दाखले व जातवैधतेचे खोटे प्रमाणपत्र मिळणे शक्य होईल. त्यामुळे भविष्यात अनुसूचित याव्या, जाती, अनुसुचित जमाती तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील मुळ व खऱ्या नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या अधिसुचना रद्द करण्या तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी, यासाठी गांधी चौकातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी संयोजक सचिन राजूरकर यांनी भूमिका मांडली. यावेळी प्रमोद बोरीकर यांनी अनुसुचित जमातीचे तर नभा वाघमारे यांनी अनुसुचित जातीचे प्रतिनिधी म्हणून भूमिका मांडली. बबलू कटरे यांनी सुद्धा भूमिका विशद केली यानंतर मोर्चात सहभागी नागरिकांच्या मागणीनुसार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार व वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दोन्ही अधिसूचना रद्द होण्यासाठी विधानसभेत संपूर्ण ताकदीनिशी संघर्ष करण्याचा शब्द उपस्थित जनसमुदायाला दिला.
जिल्हा प्रशासनातर्फे उपनिवासी जिल्हाधिकारी कुंभार यांनी मोर्चाच्या ठिकाणी निवेदन स्वीकारले. निवेदन देताना मोर्चाच्या आयोजन समितीचे संयोजक, दिनेश चोखारे, नंदू नागरकर जयदीप रोडे, सतिश भिवगडे, गोमती पाचभाई, डॉ. दिलिप कांबळे, प्रविण खोब्रागडे, पांडुरंग टोंगे, अनिल धानोरकर, विलास माथनकर, जितेश कुळमेथे, विजय मडावी, कृष्णा मसराम, रविंद्र टोंगे, विजय बलकी, प्रेमानंद जोगी, पांडुरंग टोंगे, सूर्यकांत खनके, प्रा. अनिल शिंदे, भोला मडावी, राजा अडकीने, अवधूत कोटेवार, अमोल घोडमारे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम लेडे, डॉ. संजय घाटे व पप्पू देशमुख तसेच आभार प्रदर्शन अॅड. पुरूषोत्तम सातपुते यांनी केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार व अजित पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट),गोंडवाना गणतंत्र पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, यंग चांदा ब्रिगेड, आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी, शेतकरी संघटना जनविकास सेना अशा विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे मोर्चाचे नेतृत्व महिला व मुलींनी केले. नामदार विजय वडेट्टीवार, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मागे राहुन मोर्चात सहभाग घेतला.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission, Savitri Mata Phule