सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक समाज महिला संघ आयोजित पहिले महिला अधिवेशन रविवार दि. १० मार्च २०२४, सकाळी ९.०० वाजता स्थळ : ज्ञानदेवी सावित्रीमाई फुले सभा मंडप, जि. प. प्राथ. शाळेसमोर, नायगाव ता. खंडाळा जि. सातारा
अधिवेशनाची रूपरेषा दि. ९ मार्च २०२४ वार शनिवार सायं. ७:०० वा. मी सावित्री बोलतेय- वैशाली धाकुलकर, अमरावती यांचा एक पात्री प्रयोग रात्री ८ : १५ वा सावित्रीमाई फुले आजच्या महिलासाठी दिपस्तंभ याविषयावर व्याख्यान होईल. रात्री ८.३० पासून भोजन
अधिवेशन मुख्य दिवस दि. १० मार्च २०२४ वार रविवार स. ८. ३० वा. ह.भ.प. विजय महाराज भोईर रा. शिरूर यांचे सत्यशोधकीय किर्तन
उद्घाटन सत्र स. ९.३० वा. मा. रुपाली ताई चाकणकर अध्यक्षा :- महाराष्ट्र महिला आयोग यांचे हस्ते सत्यशोधक समाजाच्या झेंडयाचे ध्वजारोहण होईल.
प्रमुख अतिथींचा सत्कार व मनोगत वंदनाताई बनकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने उद्घाटन सत्राची समाप्ती.
प्रथम सत्र : महिला गट चर्चा सत्र स. ११:३० वा. विषय- प्राचीन भारताची क्रांतीकारी महिला कालांतराने गुलाम का झाली ? याविषयावर महिलांमध्ये गट चर्चा होईल. या सत्राची अध्यक्षता सुपरिचित व्याख्यात्या अॅड वैशालीताई डोळस, छ. संभाजीनगर या करतील. अधिवेशनातील विविध ठराव पारीत केले जातील.
तरी सर्वाना विनंती करण्यात आली आहे की, या ऐतिहासिक पहिल्या सत्यशोधक समाजाच्या महिला अधिवेशनास जास्तीत जास्त महिला भगिनींनी सहभागी व्हावे व तन मन धनाने साथ सहयोग देऊन अधिवेशन यशस्वी करावे. या अधिवेशनात सूत्र संचालन, प्रास्ताविक, आभार तसेच प्रमुख अतिथी व वक्ते या सर्व भूमिका महिला पार पाडतील.