आंबेडकराईट मुव्हमेंटचे वाड्.मयीन पुरस्कार जाहीर

डॉ. यशवंत मनोहर यांना जीवन गौरव, मिलिंद कीर्ती, प्रतिमा इंगोले, उल्हास निकम यांनाही पुरस्कार

     आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अॅण्ड लिटरेचर या संस्थेच्या वतीने "आंबेडकराईट मुव्हमेंटचा वाङ्मय पुरस्कार' वितरण सोहळा दि. ९ मार्च रोजी विदर्भ हिंदी मोरदन येथे आयोजित करण्यात आला आहे. या संस्थेत सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाचा ध्यास घेऊन दलित, शोषित, पीडित आणि माणसाचे जीवन आपल्या साहित्यकृतीतून अभिव्यक्त करणाया आंबेडकरनिष्ठ साहित्यिकांना दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर वाङ्मय पुरस्कार दिले जातात. पंदा संस्थेच्या पुरस्काराचे हे १० वे वर्ष असून निष्ठावंत भाष्यकार, विचारवंत व ज्येष्ठ कवी डॉ. यशवंत मनोहर यांना या वर्षीचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. यशवंत मनोहर यांनी आपल्या उत्तुंग प्रतिभेने व प्रगल्भ चिंतनाने आंबेडकरवादी मराठी साहित्याला सामाजभिमुख केले आहे. तसेच कर्मशील भारती यांनी दलित जरी कलम को दर्द कहने दो, मेरा वजूद आजादी किसकी आदी पुस्तके लिहून हिंदी दलित साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे.

ambedkarite movement Vangmay Puraskar    समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कारासह दहा हजार रुपये रोख, शाल, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. तर प्रत्येकी पाच हजार रुपये रोख, शाल, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्काराचे स्वरूप आहे. यानिमित्ताने संस्थेचे भूपेश बुलकर, डॉ. सविता कांबळे, डॉ. सुदेश भोवते, राजन वाघमारे, महेंद्र गायकवाड, डॉ. सुरेश वर्षे, पल्लवी जीवनतारे, रमेश सोमकुवर, गौरव धूल मे कां आदींनी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचे अभिनंदन केले आहे.

राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी

     राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिलिंद कीर्ती (नागपूर) यांना त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग सहमतीची हुकूमशाही, ॲरिस्टोक्रसी टू टेक्रोक्रसी' या पुस्तकाला वसंत मून वैचारिक संशोधन पुरस्कार, उल्हास निकम (मुक्ताईनगर) यांना त्यांच्या अंगुलीमाल' या कादंबरीला बाबुराव बागूल कादंबरी पुरस्कार, राजू बाविस्कार (जळगाव) यांना त्यांच्या काळ्यानिळ्या रेषा आत्मकथाला
दया पवार आत्मकथन पुरस्कार, प्रशांत वंजारे (आर्णी, यवतमाळ) यांना त्यांच्या 'आम्ही युध्दखोर आहोत' कवितासंग्रहाला नामदेव ढसाळ काव्यपुरस्कार, प्रतिमा इंगोले (पुणे) यांना त्यांच्या तारण्याची खबर नाटकाला अश्वघोष नाट्यपुरस्कार, कर्मशील भारती (दिल्ली) यांना त्यांच्या 'क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले' पुस्तकाला डॉ. भगवानदास हिंदी दलित साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209