चंद्रपूर : बिहार राज्याने यशस्वीरित्या जातिनिहाय जनगणना केली आहे. आंध्र प्रदेशात सुद्धा १९ जानेवारी,२०२४ पासून जातिनिहाय जनगणनेला सुरुवात झाली आहे. तेव्हा महाराष्ट्र राज्यातही जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे यासाठी ओबीसी जनमानसात जनजागरण करण्यासाठी ओबीसी जनगणना संकल्प यात्रेला सेवाग्राम येथून सुरूवात होणार असून या जनगणना संकल्प यात्रेचे चंद्रपूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत होणार आहे.
विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातून ही यात्रा ब्रह्मपुरी येथे आज पोहचणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत करण्यासाठी ओबीसी सेवा संघ तर्फे सकल ओबीसी समाजाची बैठक आयोजित करण्यात आली. यात्रा मुख्य शहरांसोबतच ग्रामीण भागातून सुद्धा मार्गक्रमण करणार आहे. ओबीसी जनगणना संकल्प यात्रा संयोजक उमेश कोर्राम, संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे, ओबीसी सेवा संघाचे, जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल डहाके यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी नंतर ८ फेब्रुवारीला ही यात्रा नागभीड, सिंदेवाही, मूल, पोंभुर्णा, गोंडपिपरी,
विसापूर बामणी फाटा, बल्लारपूर, पोहचणार १० फेब्रुवारीला नांदगावपोडे, हडस्ती, कढोली, राजुरा, गडचांदूर पोहचणार ११ फेब्रुवारीला खमापूर, बाखर्डी, निमणी, कवठाळा, वणी, भद्रावती येथे यात्रा पोहचणार आणि १२ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता वडगांव फाटा - जनता कॉलेज चौक-वरोरा नाका -प्रियदर्शनी सभागृह -जि. प. जटपुरा गेट- छत्रपती शिवाजी महाराज चौक - म. गांधी चौक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक - बॅ. खोब्रागडे स्मारक - जटपुरा गेट - दवाबाजार रामनगर चौक मार्गे दीक्षा भूमी, चंद्रपूर येथे यात्रेचा समारोप होणार आहे.
यात्रा नियोजन करण्यासाठी धनोजे कुणबी समाज मंदिर, वडगांव, चंद्रपूर येथे आयोजित बैठकीचे अध्यक्ष सूर्यकांत खनके, प्रमुख मार्गदर्शक ॲड. पुरुषोत्तम सातपुते, नंदूभाऊ नागरकर, यात्रा संयोजक प्रा. अनिल डहाके व हिराचंद बोरकुटे, लक्ष्मणराव धोबे, विजयराव टोंगे, संदीप गिर्हे, प्रा. नरेंद्र बोबडे , सुनील मुसळे, डॉ. कांबळे, अनिल शिंदे, अवधूत कोठेवार, विलास माथानकर, प्रा. सुरेश विधाते, इत्यादी उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Mandal commission, Vishwanath Pratap Singh