चंद्रपूर १३ फेब्रुवारी - मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, ओबीसींची जनगणना करण्यात यावी, ओबीसींचे ७२ वसतिगृह, आधार योजना सुरू करावी, २६ जानेवारीला काढलेली अधिसूचना करावी आदी मागण्यांना घेऊन वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून निघालेल्या ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचा समारोप चंद्रपूर महानगरात झाला. महानगरातील वडगाव फाटा ते दीक्षाभूमीपर्यंत पायी मार्च काढण्यात आला.
ही संकल्प यात्रा वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यांतून चंद्रपुरात आली. ही संकल्प यात्रा संयोजक उमेश कोराम, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके यांच्या नेतृत्वात निघाली. जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, पोंभुर्णा, गोंडपिपरी, बामणी फाटा बल्लारपूर, विसापूर, नांदगाव पोडे, कढोली, गडयांदूर, लखमापूर बाखर्डी, निमणी, कवठाळा, भद्रावती येथे या यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता वडगाव फाटा - जनता कॉलेज चौक- वरोडा नाका प्रियदर्शिनी सभागृह जटपुरा गेट-छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा गांधी चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक - बॅ. खोब्रागडे स्मारक जटपुरा गेट दवाबाजार- रामनगर चौक मार्गे दीक्षा भूमी येथे यात्रेचा समारोप झाला.
यावेळी झालेल्या समेत उमेश कोराम, प्रा. अनित डहाके, अॅड. पुरुषोत्तम सातपुते, प्रा. सूर्यकांत खनके यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मनस्वी गिडे यांनी तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission, Vishwanath Pratap Singh