चंद्रपूर - मराठा सेवा संघ चंद्रपूरङ द्वारा दरवर्षी भव्य शिवजयंती महोत्सव व जाहीर व्याख्यान समारंभ आयोजित केल्या जातो. १९ फेब्रुवारी हा शिवजन्मोत्सवाचा दिवस मराठा सेवा संघाच्या वतीने लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो आणि याच कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक पर्यावरण इत्यादी क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांना चंद्रपूर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे मराठा सेवा संघ चंद्रपूर व्दारा आयोजित केली असून जयंती निमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा 'चंद्रपूर गौरव पुरस्कार' इको प्रो संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शिवजयंती महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष कुचनकर, उदघाटिका रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था बाबुपेठ चंद्रपूर च्या अध्यक्षा चंदा वैरागडे आहे तर प्रमुख व्याख्याता जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सिमा बोके असून प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष दिपक जेऊरकर, मराठा सेवा संघ चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष इंजि. दिपक खामनकर आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे.
Satyashodhak, Bahujan