आसलगाव - सेठ तुळशिराम ढोकणे कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव, ता. जळगांव जामोद येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबीर ग्राम सावरगाव येथे श्री. जगदंबा देवी संस्थान मध्ये घेण्यात आले. २४ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांचे आगमन झाले व परीसर स्थळाची स्वच्छ्ता करण्यात आली. तर २५ डिसेंबरला उद्घाटन सोहळा संपन्न झाला. उद्घाटन सोहळासाठी सर्व मान्यवर उपस्थित होते.
२६ ते २८ पर्यंत पालक व पाल्य यांच्यातील संवादाचे महत्व, मोबाईल चे दुष्परिणाम, सापाबददल समज गैरसमज, व्यक्तिमत्व विकास नेतृत्वगुण, स्पर्धा व युवक, इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी सरकारी वकील व अभियोक्ता ॲड. एस. वाय. खिरोडकर, मा. शिक्षण मंडळ सदस्य अमरावती व डॉ. आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त प्रा. नानासाहेब कांडलकर सर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ अध्यक्षा ॲड. सौ. ज्योतीताई ढोकणे, प्रा. कल्पणाताई इंगळे, जळगांव जामोद तालुका गट शिक्षणाधिकारी वामनराव फंड, आदर्श विद्यालयाचे स. शिक्षक बावसकर, केंद्र प्रमुख कुवारे सर, सर्पमित्र शरद जाधव सर, सर्पमित्र आश्विन कवरे सर, सुपो महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक हिम्मतराव आटोळे सर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. निलेश निंबाळकर सर, सिद्धिविनायक अकॅडमी चे संचालक गोपाल गायकी सर, अविनाश देशमुख सर, भाई भास्करराव शिंगणे विद्यालयाचे मुख्याध्यापक केशव हिंगणे उपस्थित होते. ३० डिसेंबर रोजी समारोप करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी प्रकाशसेठ ढोकणे, अॅड. सौ. ज्योतिताई अशोकराव ढोकणे, आसलगाव सरपंच विष्णू इंगळे, सुनिल येनकर मा. पं. स. सदस्य, दिलीप आकोटकर, माजी केंद्रप्रमुख ढोले व इतर मान्यवर उपस्थित होते.
रासेयो शिबिरासाठी सावरगाव सरपंच सौ. कविता कराळे, उपसरपंच संदीप मोरे, पोलीस पाटील नंदा मोरे, प्रमिला नागपुरे, संगिता सदाफुले, सुनीता उकरडे, मालती दाभाडे, मिना शेगोकार, ज्ञानेश्वर सोनोने, रफिक बेग हाफिज, तंटामुक्ती अध्यक्ष शे. मोबीन शे. मुनाफ, शाळा समिती अध्यक्ष दिपक मुळे, प्रतिष्ठित नागरीक उद्धव सातव, प्रकाश कराळे सस्थांचे अध्यक्ष गोपाळ कराळे, ग्रामसेवक देवरे, तलाठी गायकवाड, जि. प. मुख्याध्यापक ताडे उपस्थित होते.
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan