अकोला : राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने जिजाऊ जयंती शुक्रवार, १२ जानेवारी रोजी शहरातील मुकुंद नगर येथे राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून त्यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या जिल्हाध्यक्ष वर्षा अरविंद पिसोळे यांच्या हस्ते करण्यात आले. माता जिजाऊ यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून आदर्श माता राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले तसेच स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रकट करण्यात आले. यावेळी अर्चना ठाकरे, सविता नागापुरे, वंदना कराळे, संगीता आखरे, संगीता देशमुख, रंजना जावरकर, शारदा जावरकर, शैलजा गावंडे, दामिनी नागापुरे यांच्यासह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.