वणी - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला शिवतीर्थावर जाहीर व्याख्यान होणार आहे. यात प्रमुख ठराव मांडल्या जाणार आहे. सोमवारी संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थावर सायंकाळी सहा वाजता अभिवादन होणार आहे. त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य, तथा चंद्रपूर जिल्हा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ दिलीप चौधरी यांचे व्याख्यान सायंकाळी सात वाजता होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर, उद्घाटन माजी आमदार विश्वास नांदेकर, महासंघाचे संजय खाडे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे नितीनकुमार हिंगोले उपविभागीय अधिकारी, गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ. शांताराम ठाकरे सेवानिवृत्त तालुका आरोग्य अधिकारी, वणी, अजय धो जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, प्रा. बाळकृष्ण राजूरकर अध्यक्ष महात्मा फुले वाचनालय, नामदेवराव जेनेकर अध्यक्ष विदर्भ जनआंदोलन समिती, संजय निमकर सचिव क्रेडाई, रमेश येरणे अध्यक्ष संताजी ज्ञान प्रसारक मंडळ, अनिल हेपट क्षेत्रीय योजना अधिकारी वेकोली, वंदना आवारी जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमेटी, यवतमाळ, किरण देरकर संस्थापक अध्यक्षा सम्मान स्त्री शक्ती फाउंडेशन, भारती राजपुत तालुकाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड, वणी, देवराव धांडे अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष, अॅड. विनोद चोपणे उपाध्यक्ष बार असो. वणी, मंगल तेलंग जिल्हा सचिव वं.ब.आ., विजय नगराळे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी, रवी चंदने तालुकाध्यक्ष जुनी पेन्शन संघटना, डॉ. अविनाश खापने संचालक, कुसुमाई हॉस्पीटल, वणी आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Satyashodhak, Bahujan