अमरावती जिल्हा आणि तिवसा मतदार संघ परिसरातील मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता.अखेरीस तिवसा येथे मुलींचे वस्तीगृह सुरू करण्यासाठी सुमारे १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यश आले. या माध्यमातून आज तिवसा येथे मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन माजी महिला बालविकास मंत्री आमदार मा.यशोमतीताई ठाकुर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या आमदार यशोमतीताई ठाकुर यांच्या दूरदृष्टीने तिवसा शहराच्या मध्यभागी प्रभाग क्रमांक १५ मद्ये होणाऱ्या या वस्तीगृहामुळे अमरावती जिल्ह्यातील आणि परिसरातील मागासवर्गीय मुलींसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.. यावेळी तिवसा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष योगेश वानखडे, नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती सौ प्रियाताई विघ्ने, तालुका अध्यक्ष सतिशभाऊ पारधी दिलीपभाऊ काळबांडे माजी जिल्हा परिषद सभापती काँग्रेस जिल्हा सचिव मुकुंदकाका देशमुख तिवसा शहर अध्यक्ष सेतूकाका देशमुख यांच्यासह तिवसा प्रभाग क्रमांक १५ नगरसेवक अमर वानखडे, माजी नगराध्यक्ष नगरसेवक वैभवभाऊ वानखडे , नगरसेवक किसनराव मुंदाने पिंटूभाऊ राऊत, अजयजी शिरभाते, मुकुंदजी देशमुख, नगरसेवक नरेशजी लांडगे, रमेशजी बोरीकर , किरणभाऊ भोयर, मंगेशजी मनोहर, उमेशजी मनोहर, पुरुषोत्तमजी वानखडे, वानखडे ताई, देशमुख ताई अतुलदादा गवड किशोरभाऊ दिवे श्री पांडे काका बापूरावजी शापामोहन नानाभाऊ माहोरे नीलेशजी गावंडे प्रशांतभाऊ बोबडे, अंकुशभाऊ देशमुख राहुलभाऊ खेडकर सुरज बोराडे लोकेश केने अमोल विघे आणि अन्य कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.