मराठा सेवा संघ द्वारा आयोजित शिवजयंती महोत्सव चंद्रपूर २०२४

    जगाच्या पाठीवर समतेचे, ममतेचे व न्यायाचे राज्य निर्माण करुन माणसातील माणुसपण जागे करणारे मानवतेच्या अस्मितेचे जनक, विश्ववंद्य, कुळवाळीभूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती १९ फेब्रुवारी २०२४ रोजी जगात सर्वत्र साजरी होत आहे. संपूर्ण भारतीय समाजमनाला एकसूत्रात बांधणाऱ्या तत्वज्ञानाचे नाव म्हणजे विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज, शीर्ष आणि शिलाचा उत्तुंग आदर्श असणाऱ्या या प्रेरक | व्यक्तिमत्वाला संपूर्ण जगात आदराने वंदन केले जाते. ज्यांच्या किर्तीपुढे आजवर अनेक जगप्रसिद्ध योद्धे नतमस्तक झालेत ते छत्रपती शिवराय जागतीक वारसा ठरतात.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Mahotsav Chandrapur 2024 organized by Maratha Seva Sangh     भारतामध्ये महात्मा ज्योतिराव फुले व राजर्षी शाहूजी महाराज यांनी शिवजन्मोत्सव लोकोत्सव करण्यासाठी त्या त्या काळी पुढाकार घेतला. आज २०२४ मधील भारतीय समाजाची स्थिती लक्षात घेतल्यास विविध माध्यमातून विविध स्तरांमध्ये विभाजीत होत असलेल्या भारतीय | समाजाला एकत्रितपणे बांधुन ठेवण्याची क्षमता छत्रपती शिवाजी महाराज या नावात आहे. यामुळेच १९ फेब्रुवारी हा शिवजन्मोत्सवाचा दिवस मराठा सेवा संघाच्या वतीने लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी मा. सिमाताई बोके, प्रदेशाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.या कार्यक्रमास आपण सहकुटुंब सहभागी व्हावे, ही विनंती करण्‍यात आलेली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Mahotsav Chandrapur 2024    जाहिर व्याख्यान समारंभ - सोमवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२४, वेळ : सायंकाळी ६.३० वाजता., स्थळ : प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर, प्रमुख व्याख्यात्या -  मा. सिमाताई बोके प्रदेशाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य विषय: छत्रपती शिवरायांचे महिलांविषय धोरण आणि सध्याचे वास्तव. आयोजक मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड जिल्हा शाखा, चंद्रपूर

     कार्यक्रमाचे अध्यक्ष  : मा. संतोषभाऊ कुचनकर, जिल्हाध्यक्ष, मराठा उद्योजक कक्ष, चंद्रपूर,

     उद्घाटीका : मा. चंदाताई वैरागडे, अध्यक्षा, रणरागिनी महिला नागरी सहकारी पतसंस्था, बाबुपेठ, चंद्रपूर,

     व्याख्यात्या : मा. सिमाताई बोके, प्रदेशाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य विषय- छत्रपती शिवरायांचे महिलांविषय धोरण आणि सध्याचे वास्तव.

    चंद्रपूर गौरव पुरस्कार : मा. बंडूभाऊ धोत्रे, अध्यक्ष, इको प्रो. संस्था, चंद्रपूर

    प्रमुख पाहुणे :  मा. दिपकजी जेऊरकर, प्रदेश उपाध्यक्ष, मराठा सेवा संघ, महाराष्ट्र राज्य

    मा. इंजि. दिपकजी खामनकर, जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ, चंद्रपूर

    मा. विनोदभाऊ थेरे, महानगर अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, चंद्रपूर

    मा. लताताई होरे, जिल्हाध्यक्षा, महिला आघाडी, संभाजी ब्रिगेड, चंद्रपूर

    मा. डॉ. प्रितीताई बांबोळे, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ, चंद्रपूर

    मा. प्राचार्या शुभांगीताई आसूटकर, जनता महाविद्यालय डी. एड. कॉलेज, चंद्रपूर

    मा. वैशालीताई भेदे, सामाजिक कार्यकर्त्या, चंद्रपूर

    प्रास्ताविक : मा. अर्चनाताई चौधरी, जिल्हाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड, चंद्रपूर

    सुत्रसंचालन : मा. प्रा. शुभांगीताई ठाकरे, संघटक, जिजाऊ ब्रिगेड, चंद्रपूर

    आभार प्रदर्शन : मा. सिमाताई तेलकापल्लीवार, कोषाध्यक्ष, महिला आघाडी, संभाजी ब्रिगेड, चंद्रपूर

 

    विनीत 

    मा. इंजी. दिपक खामनकर जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ, चंद्रपूर

    मा. अर्चना चौधरी जिल्हाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड, चंद्रपूर

    प्रा. डॉ. दिलीप चौधरी जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, चंद्रपूर

    मा. विनोद थेरे महानगर अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, चंद्रपूर,

    मा. संजय येरने जिल्हाध्यक्ष,  ज. तु.सा. परिषद, चंद्रपूर

    मा. शंकरराव लोनगाडगे जिल्हाध्यक्ष  डॉ. पंजाबराव देशमुख, राष्ट्रीय शिक्षक परिषद, चंद्रपूर

    मा. संतोष कुचनकर जिल्हाध्यक्ष, मराठा उद्योजक कक्ष, चंद्रपूर

    मा. अंकुश गोहणे जिल्हाध्यक्ष, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, चंद्रपूर

    मा. संदिप दातारकर जिल्हाध्यक्ष, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद, चंद्रपूर

    मा. अक्षय लोणारे जिल्हाध्यक्ष, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद, चंद्रपूर

    मा. जितेंद्र टोंगे अध्यक्ष, जगद्गुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय, तुकूम, चंद्रपूर

    मा. स्मिताताई ठाकरे अध्यक्षा, मराठा अर्थकोष कक्ष, चंद्रपूर

    मा. प्रशांत गोखरे जिल्हा समन्वयक, शिवधर्म, चंद्रपूर

    मा. विनोद बदखल अध्यक्ष, तानुबाई बिरजे पत्रकार परिषद, चंद्रपूर

    तथा मराठा सेवा संघ प्रणित सर्व कक्षाचे पदाधिकारी

Satyashodhak, Mahatma phule, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209