जळगाव जामोद : आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत अशोभनीय भाषा वापरल्याचा आरोप करीत आ. संजय गायकवाड यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी करावे, अशी मागणी करीत समता परिषद, ओबीसी व इतर सर्व मागासवर्गीय संघटनांनी दि. २ फेब्रुवारी रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच या वक्तव्यचा निषेध करण्यात आला.
यासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले. सर्व संघटनांनी गायकवाड यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र राज्य ओबीसी महिला महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष ज्योती ढोकणे, ओबीसीचे जिल्हाध्यक्ष ओ. पी. तायडे, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव घुटे, ओबीसी परिषदेचे विदर्भ अध्यक्ष राजेश लहासे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, शिवसेना शहर प्रमुख रमेश ताडे, काँग्रेस शहर प्रमुख अर्जुन घोलप यांच्यासह महादेव इंगळे, प्रकाश ढोकणे, गजानन देवीकर, विक्रांत उमरकर, डॉ. संदीप वाकेकर, डॉ. सतीश शिरेकर, महादेव म्हसाळ, विश्वंभर वावगे, अॅड. दिनेश सातव, प्रदीप दाते, अनंता पारसकर, रवी इंगळे, ऋषिकेश गिरे, संजय म्हसाळ, श्रीराम मानकर, निलेश वानखडे, अँड. गजेंद्र सातव, किसन भगत, नितीन जाधव, गणेश सातव, अनिल इंगळे, संजय भोंगाडे, नरेश वाकेकर, संजय दंडे, अमोल वानखडे यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.