ओबीसी समाजासाठी लढा देणाऱ्या छगन भुजबळ यांच्याविरोधात एकेरी भाषेत वक्तव्य करणाऱ्या आ. संजय गायकवाड यांचा जळगाव जामोद ओबीसी समाजाकडून निषेध व्यक्त करत त्यांना पदावरून बरखास्त करण्याच्या मागणीचे निवेदन आज २ फेब्रुवारी रोजी तहसिलदारांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आ. संजय गायकवाड यांनी १ फेब्रुवारी रोजी ओबीसीसाठी लढा देणारे छगन भुजबळ यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्यामुळे संपूर्ण ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. सत्ताधारी पक्षातील मित्र पक्षाच्या मंत्र्यांविरोधात अर्वाच्य भाषेत भाष्य करणाऱ्या आ. गायकवाड यांना पदावरून बरखास्त करावे, अशी मागणी जळगाव जामोद शहर व तालुक्यातील ओबीसी बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देतांना ओबीसी महिला प्रदेशाध्यक्ष ज्योतीताई ढोकणे, डॉ. सतीश शिरेकार, संदीप वाकेकर, प्रकाश ढोकणे, अविनाश उमरकर, राजू घुटे, रमेश ताडे, ओ. पि. तायडे, विश्वंभर वावगे, महादेव म्हसाळ, राजेश लहासे, अर्जुन घोलप, संजय दंडे, अॅड. दिनेश सातव, प्रदीप दाणे, अनंता पारसकर, रवि दाणे, ऋषिकेश गिऱ्हे, संजय तायडे, श्रीराम मानकर, निलेश मानकर, किसन भगत, नितीन जाधव, गणेश सातव, संजय भोंगाळे, नरेश वाकेकर, संजय भोंगाळे, अमोल वानखडे बहुसंख्य ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.