चंद्रपूर - राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती, त्या मागणीला ओबीसी समाजाने तीव्र विरोध दर्शवला. आता मात्र जरांगे पाटलांनी हद्दच केली आहे, आई ओबीसी असेल तर ओबीसी जात प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. त्यांची ही मागणी हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिली आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी करीत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आधीपासून मागणीला विरोध केला आहे आणि चंद्रपूरमध्ये २१ दिवस अन्नत्याग आंदोलन सुध्दा केले आहे. २९ सप्टेंबर २०२३ ला मुंबई येथे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ओबीसी मंत्री, मुख्य सचिव ओबीसींच्या सर्व संघटना यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही, असे आश्वासित केले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात येऊन उपोषणाची सांगता करीत आश्वासन पूर्ण करण्याचे लेखी पत्र सुद्धा देण्यात आले. जरांगे पाटील यांनी आई ओबीसी असेल तर जात प्रमाणपत्र देण्याची मागणी हास्यास्पद आहे, मग आई अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या प्रवर्गातील असेल तर ते सुध्दा स्वीकार करणार का ? असे सचिन राजुरकर यांनी म्हटले आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission